Earthquake sakal
नागपूर

Earthquake : भूकंपाचे हादरे जाणवल्यास घाबरू नका, खबरदारी घ्या

नागपूर व आसपासचा परिसर हा भूकंपप्रवण क्षेत्र नाही. असे असतानाही गत तीन दिवसांत जिल्ह्यातील पारशिवनी, कुही आणि उमरेड तालुक्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - नागपूर व आसपासचा परिसर हा भूकंपप्रवण क्षेत्र नाही. असे असतानाही गत तीन दिवसांत जिल्ह्यातील पारशिवनी, कुही आणि उमरेड तालुक्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हे धक्के अगदीच सौम्य असल्याने त्याचा कुठलाही परिणाम नागरिकांवर झाला नाही. पण भविष्यात कधी मोठा धक्का बसलाच तर त्यासाठी नागरिकांनी तयार असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे अशावेळी घाबरून न जाता काही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

कसे होते भूकंपाचे मापन

भूकंपाची तीव्रता ही प्रामुख्याने ‘रिश्टर स्केल’ (Richter scale) या एककात मापली जाते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रात त्याची नोंद केली जाते. या रिश्टर स्केलचे एक ते दहा असे गट पडतात. सिस्मोग्राफद्वारे त्याचे मापन केले जाते. १.९ रिश्टर स्केल एवढा भूकंप केवळ सिस्मोग्राफद्वारे शोधला जाऊ शकतो.

२.९ - केवळ लटकलेल्या गोष्टी हलताना दिसतात. ३.९ - दरम्यान हादरे जाणवू लागतात. ४.९ - भूकंपाचे धक्के प्रत्येकाला जाणवतात. छोट्या छोट्या गोष्टी तुटण्याची शक्यता असते. ५.९- वस्तू जागेवरून हलतात. भिंतीला तडे जाऊ शकतात. ६.६९ - इमारतींचे पडू शकतात. ७.९ - रिश्टर स्केलवर आकडा ७ किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर इमारती कोसळू शकतात आणि जमिनीवर भेगा पडू शकतात. ८.९ - मोठ्या प्रमाणावर विनाश होऊ शकतो. ९ किंवा त्याहून अधिक तीव्रता असल्यास जमिनीला मोठे हादरे बसून जामीन फाटण्याची शक्यता असते व त्सुनामी येण्याची शक्यता असते.

घराबाहेर असाल तर

  • असाल त्या जागेवरून कुठेही हलू नका. मात्र, इमारती, झाडे, पथदिवे आणि विजेच्या तारांपासून दूर व्हा.

  • मोकळ्या जागेवर असाल, तर धक्के कमी होईपर्यंत तिथेच थांबा. भूकंपात बऱ्याचदा भिंती कोसळतात, काचा फुटतात, वस्तू पडतात असे आढळून आले आहे.

चालत्या वाहनात असाल तर

  • सुरक्षित ठिकाण पाहून लगेच वाहन थांबवा आणि वाहनाच्या आत थांबा. मात्र, इमारती, झाडे, विजेच्या तारांजवळ थांबू नका.

  • भूकंप थांबल्यानंतर हळूहळू वाहन सुरू करा. भूकंपाचा धक्का बसलेले रस्ते, पूल आणि उतारावरून जाणे टाळा.

घरी असाल तर

  • जमिनीवर बसा, टेबलखाली जाऊन स्वतःला झाकून घ्या.

  • आतल्‍या दाराची चौकट, खोलीचा कोपरा, टेबल किंवा पलंगाच्या खाली थांबावे.

  • काचा, खिडक्या, बाहेरील दरवाजे आणि भिंती किंवा कोसळू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून लांब राहा.

  • भूकंप आल्यानंतर लोक बाहेर पडून इतर ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतानाच जखमी होतात असे अनेक संशोधनाअंती आढळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT