Do you want to treat only corona patient Doctors ask Question 
नागपूर

केवळ कोरोनाबाधितांवरच उपचार करायचे का? निवासी डॉक्टरांची व्यथा

केवल जीवनतारे

नागपूर : मागील दीड वर्षात कोरोनाशिवाय दुसरं कोणतेच वैद्यकीय शिक्षण निवासी डॉक्टरांच्या वाट्याला आले नाही. सर्व निवासी डॉक्टर कोरोना रुग्णांना हाताळत असताना इतर संवर्गातील रुग्णांना हाताळण्यावर जणू मर्यादा आल्या आहेत. केवळ कोरोना एके कोरोना विषाणू हाताळून पदव्युत्तर शिक्षणाची पदवी मिळाल्यास सर्व व्याधींवरील सेवा देणारे दर्जेदार डॉक्टर कसे तयार होतील? हा सवाल आहे मार्ड संघटनेशी जुळलेल्या निवासी डॉक्टरांचा.

कोरोना काळात पहिल्या दिवसापासून कर्तव्य सांभाळताना शेकडो निवासी डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली. बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोनारुग्णांना सेवा देण्याचे कर्तव्य पार पाडत आहोत. मात्र एमडी या वैद्यकीय अभ्यासक्रमातील पदव्युत्तर शिक्षण घेताना प्रत्येक विद्यार्थी औषधशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूती, अस्थिरोग, बालरोगासह इतरही क्लिनिकल व नॉन क्लिनिकल विषयांमध्ये तज्ज्ञ होतो.

परंतु सारे निवासी डॉक्टरांना सध्यातरी केवळ कोविडचाच विचार करण्यास भाग पाडत आहेत. इतरही विविध प्रकारचे रुग्ण निवासी डॉक्टरांना हाताळण्यासाठी मिळत नाही. कोरोनामुळे सध्या या रुग्णांना तपासण्याची संधीच रुग्णालयात उपलब्ध नाही. तर मेयोसारख्या रुग्णालयात केवळ कोविड रुग्णांवरच उपचार केले जात आहेत. इतर रुग्णांना इतरत्र रेफर केले जात आहे. 

२४ तास राबणारे निवासी डॉक्टर

कोविड वॉर्डात केवळ निवासी डॉक्टरांच्या सेवा लावण्यात आल्या आहेत. मेयोचा विचार करता सुमारे २१० च्या वर निवासी डॉक्टर आहे. पैकी १२५ डॉक्टरांची सेवा कोविडमध्ये लावण्यात आली आहे. याशिवाय ३० ते ४० डॉक्टर बाधित असल्याने विलगीकरणात आहेत. इतर रुग्ण हाताळण्यासाठी पन्नास डॉक्टरही शिल्लक नाहीत. कोविडच्या बाह्यरुग्णविभागापासून आंतररुग्णापर्यंत निवासी डॉक्टर पहिल्या फळीत राहून रुग्णसेवा देत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी वैद्यकीय अधिकारी नियुक्त करत पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांना शिक्षणासाठी सवलत देणे अपेक्षित होते. परंतु तसेही झाले नाही. या निवासी डॉक्टरांच्या अभ्यासक्रमाचा विचार करून तातडीने पर्यायी डॉक्टरांकडून उपचाराची सोय करण्याची गरज असल्याचे मेयोतील मार्डचे अध्यक्ष डॉ. रजत अग्रवाल म्हणाले.

प्रशासनाने विचार करण्याची गरज
मेडिकल, मेयो या दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयातील वॉर्डांमध्ये निवासी डॉक्टरांच्या सेवा लावण्यात आल्या आहेत. मात्र, गैरकोरोना बाधितांच्या अनेक नियोजित शस्त्रक्रिया स्थगित करण्यात येत आहेत. त्यामुळे गैर कोरोनारुग्णांची गैरसोय होत आहे. हा प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे. 
- डॉ. रजत अग्रवाल,
अध्यक्ष, मार्ड, मेयो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांसमोर शरण गेलेला भूपती गद्दार, त्याला धडा शिकवणार! माओवाद्यांनी जारी केलं पत्रक, नेमकं काय म्हटलं?

सोलापूरच्या ६७ वर्षीय 'सीए'ला २.२८ कोटींचा गंडा! सायबर गुन्हेगारांनी शेअर मार्केटचे आमिष दाखविले, एक लाखास २५ हजाराचा परतावा लगेच दिला, नंतर...

Jalna Dog Attack : जालन्यात मोकाट श्वानाच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

Shaniwarwada Namaz Controversy : शनिवारवाड्याच्या वादावरून रूपाली ठोंबरेंचा खासदार मेधा कुलकर्णींसह पोलिसांना मोठा इशारा, म्हणाल्या...

Latest Marathi News Live Update : पुण्यातील सारसबागेत होणाऱ्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला धमक्या

SCROLL FOR NEXT