Doctor commits suicide
Doctor commits suicide  sakal
नागपूर

इंजेक्शन टोचून घेत डॉक्टरची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सासरच्या त्रासाला कंटाळून खासगी रुग्णालयातील एका डाक्टरने स्वःतला विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.१८) पहाटेच्या सुमारास घडली.

अभिजित रत्नाकर धामणकर (वय ३८ रा. गिरीबालाजीनगर, हुडकेश्‍वर) असे डॉक्टरचे नाव आहे. ते सेंट्रल एव्हेन्युवरील किमया हॉस्पिटल येथे कार्यरत होते. काल रात्रीपाळीत १० वाजता ते रुग्णालयात आले. त्यांनी काही रुग्णांची तपासणी केली आणि ते आपल्या रूममध्ये गेले. पहाटे तीन वाजताच्या सुमारास एका रुग्णाची तब्येत बिडल्याने परिचारिका अभिजित यांना उठविण्यास गेल्या असत्या डॉ. अभिजित खाली पडलेले दिसले. त्यांनी ही माहिती इतर डॉक्टरांना माहिती दिली.

डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा श्‍वास आणि नाडी बंद पडल्याने याची माहिती संचालकांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार डॉ.अभिजित यांना काही वेळ व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले. याची माहिती गणेशपेठ पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी दाखल होउन तपासणी केली. अभिजित यांच्या खिशात सुसाईड नोट आढळून आली. या सुसाईड नोटमध्ये सासरच्या मंडळीवर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान प्राथमिक तपासणीत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : युतीची सत्ता येताच उद्धवजींना मुख्यमंत्रिपदाचे वेध

आगळी दक्षिणकोंडी

‘लाट’विरहित निवडणुकीचा अन्वयार्थ...

मेंदूवर आदळणाऱ्या डिजिटल-प्रचारातून सुटलेलं काही...

एक दूसरे से करते है प्यार हम...

SCROLL FOR NEXT