doctor.jpg 
नागपूर

डॉक्टर, असं वागणं बरं नव्हे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एका विशिष्ट धर्माविरुद्ध समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह संदेश टाकणाऱ्या डॉक्टरला नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली आहे.
सोशल मिडियाचा वापर सकारात्मकतेने करावा, अशी अपेक्षा असते. निदान सर्वसामान्यांशी निगडीत असणारे शिक्षक, नेते, समाजसेवक आणि डॉक्टर यांच्यावर तर अशा माध्यमांचा योगरित्या वापर करण्याची नैतिक जबाबदारीच येते. पण, प्रत्येकजन ही जबाबदारी पार पाडतोच असे नाही. नागपूर शहरात राहणाऱ्या डॉक्टरने सार्वजनिक जीवनात आवश्यक असणाऱ्या मर्यादेचा भंग केला आणि त्याचा परिणाम म्हणजे त्याला तुरूंगाची हवा खावी लागली.  डॉ. सतीश बी. सोनार रा. समर्थनगर, अजनी असे आरोपीचे नाव आहे.

शाहबाज अब्रार सिद्दीकी रा. चौधरी ले-आऊट, अनंतनगर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डॉ. सोनार यांनी गेल्या ६ मे ला आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून मुस्लीम समुदायासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले. या संदेशामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. डॉ. सोनार हा मुस्लीम समाजासंदर्भात नियमितपणे आक्षेपार्ह संदेश समाजमाध्यमांवर टाकत असतो. हा प्रकार लक्षात येताच शाहबाज यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अजन पोलिसांनी त्यांच्या अर्जाची चौकशी केली व त्यानंतर पोलिसांनी  भादंविचे कलम २९५-अ, ५०५, २९४ आणि १८८ गुन्हा दाखल करून सोनार याला पोलिसांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder Case : प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणावरून राजकारण तापलं; नरेश म्हस्केंचा विरोधकांना इशारा, म्हणाले...

लोकांची झोप उडवून, हा भाई...! इशान किशनने अभिषेक शर्माला मारला टोमणा, Video Viral

Ravana Temple: उत्तर प्रदेशातील 'या' गावात का होते राक्षसांच्या राजाची पूजा?

Marathi News Live Updates : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतमोजणी सुरू, कमी मते मिळाल्याने दोन उमेदवार वगळले; अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष

Isapur Right Canal Irrigation: ‘इसापूर’च्या उजव्या कालव्यातून १ नोव्हेंबरपासून आवर्तन, हंगामांत प्रत्येकी २ आवर्तने; १ लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ

SCROLL FOR NEXT