doctor not admitted corona positive patients in gmc nagpur 
नागपूर

डॉक्टरसाहेब मला भरती करून घ्या, कोरोनाबाधितांची केविलवाणी विनवणी; पण, दुरूनच दाखवला जातो बाहेरचा रस्ता

केवल जीवनतारे

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. गंभीर रुग्णांची संख्या वाढली. यामुळे अनेक रुग्ण हातात कोरोना चाचणीचा अहवाल घेऊन मेयो, मेडिकल, एम्स तसेच खासगी रुग्णालयात भरती होण्यासाठी जात आहेत. मात्र, डॉक्टर दुरूनच खाटा उपलब्ध नसल्याचे कारण सांगतात. यामुळे दुरूनच हात जोडून 'डॉक्टरसाहेब मला दाखल करून घ्या हो' अशी विनवणी करतात. यामुळे गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातील कोरोनाग्रस्तांचा वाली कोण? हा प्रश्न नातेवाईक उपस्थित करत आहेत. 

कागदोपत्री मेडिकलमध्ये कोरोना बाधितांसाठी सुमारे १ हजार खाटा आहेत. मेयोत ६०० खाटा आहेत. एम्समध्ये ७०, तर नागपूर महापालिकेच्या साडेचारशे खाटा आहेत. उर्वरित शहर व जिल्ह्यातील खासगी रुग्णालये मिळून ५ हजारावर कोरोनाबाधितांना दाखल करून उपचाराची सोय असल्याचा दावा प्रशासनाकडून होतो. मात्र, सध्याची स्थिती बघता त्यावरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. रुग्णसंख्या अचानक वाढल्याने शहरातील मेयो, मेडिकलसह सर्व नामांकित खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. 

संसर्गाचा धोका - 
उपचारासाठी मेडिकल, मेयो, एम्ससह महापालिकेच्या रुग्णालयात भरती करून घेण्यात येत नसल्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्ण हातात कोरोनाचा अहवाल घेऊन भटकंती करीत आहेत. ही देखील धोक्याची घंटा आहे. मेडिकल, मेयोतही अतिदक्षता विभागातील खाटा नसल्याचे सांगत त्यांना परत पाठवत इतर खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे, अशी तक्रार एका नातेवाइकाने केली आहे. 

मेडिकल, मेयोला मिळणार मनुष्यबळ : कुंभेजकर 
वाढत्या रुग्णसंख्येनंतर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मेडिकल आणि मेयोत गुरुवारी बैठक घेतली. याप्रसंगी काही विषयांवर अधिकाऱ्यांनी कानउघाडणीही केली असल्याची चर्चा पुढे आली. दरम्यान मेडिकल आणि मेयोत अपुरे मनुष्यबळ असल्याने खाटांची संख्या वाढू शकत नसल्याचे वास्तव पुढे आले. यावर तत्काळ उपाययोजना करण्यात येईल, मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी कुंभेजकर यांनी दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मेडिसीन विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indias Most Richest and Poorest CM: भारतातील सर्वात श्रीमंत अन् सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? ‘ADR’ रिपोर्टमधून झाले उघड!

Latest Marathi News Updates: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Velhe News : स्मशानभूमी अभावी निगडे खुर्द गावातील नागरिकांचे हाल; भर पावसात मृतदेह नीट जळण्यासाठी ग्रामस्थांनी धरली ताडपत्री

Pune Traffic : पुणे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी; गणेशोत्सवाची खरेदी, शनिवारची सुटी आणि रस्त्यात आलेल्या मांडवांमुळे कोंडीत भर

Manchar News : मंचरजवळ गोरक्षनाथ टेकडीवर शनी अमावस्येला भाविकांची गर्दी; पहाटे चार पासून दर्शनासाठी रांगा

SCROLL FOR NEXT