Dog terror in medical trauma unit Medical hospital news 
नागपूर

भयंकर प्रकार! मेडिकलच्या ट्रॉमात रात्री कुत्र्यांचा मुक्त वावर; २००७ मध्ये कुरतडले होते बाळ

केवल जीवनतारे

नागपूर : पुढच्याला ठेच लागली की, मागचा शहाणा होतो, अशी म्हण आहे. परंतु, ही म्हण निदान मेडिकल प्रशासनाला तरी लागू होत नाही, असे चित्र आहे. तेरा वर्षांपूर्वी प्रसूत मातेच्या बाळाचे लचके कुत्र्याने तोडले होते. एवढेच काय १२ जानेवारीला अतिदक्षता विभागात कुत्री झुंडीने फिरत होती. आता पुन्हा एकदा मेडिकलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये रात्री कुत्र्यांचा मुक्त वावर सुरू होता. यामुळे अख्ख्या मेडिकलमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत पसरली आहे.

२००७ मध्ये एका प्रसूत मातेचे बाळ बेवारस कुत्र्याने कुरतडल्याची घटना घडली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले होते. मात्र, प्रशासनाने बोध घेतला नाही. नुकतेच १२ जानेवारीला मेडिकलमधील अतिदक्षता विभागात कुत्रे झुंडीने सर्रास फिरत होते. प्रशासनाने बोध घेतला नाही. सोमवारी (ता. १) रात्री पुन्हा तिसऱ्यांदा मेडिकलच्या नव्याने ट्रॉमा सेंटरमध्ये कुत्री रुग्णांच्या खाटेपर्यंत बिनदिक्कतपणे फिरत होती. यामुळे रुग्णांसह नातेवाइकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

२००७ मध्ये बेवारस कुत्र्यांनी बाळाचे लचके तोडले होते. हे प्रकरण तब्बल सात वर्षे हे न्यायप्रविष्ट होते. त्या प्रकरणाचा मेडिकल प्रशासनाला दंड ठोठावण्यात आला होता. पुन्हा एकदा कुत्र्यांची दहशत पसरली आहे. मेडिकलच्या आवारात बेवारस कुत्र्यांची प्रचंड दादागिरी सुरू आहे. वऱ्हांड्यापासून तर वॉर्डाच्या प्रवेशद्वाराच्या पुढे अतिदक्षता विभागात ही बेवारस कुत्रे दिवसाच नाही तर रात्रीही फिरत असतात.

वॉर्डातील जैविक कचरा असलेल्या पेटीतून तोंडात कचरा बाहेर घेऊन जात असल्याने रुग्णांसह नातेवाइकांनाही संसर्गाचा धोका निर्माण झाला असल्याची भावना नातेवाइकांनी व्यक्त केली. विशेष असे की, सुरक्षारक्षक चक्क झोपलेला होता. मेडिकलच्या मुळ ट्रॉमा युनिटमध्ये कोविड हॉस्पिटल आहे. यामळे तात्पुरत्या स्वरूपात वॉर्ड क्रमांक २८ मध्ये ट्रॉमा हलवण्यात आला आहे. येथे पूर्वीच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या तुलनेत कमी खाटा आहेत. येथे अपघाताचे अत्यवस्थ संवर्गातील रुग्ण दाखल होतात. त्यांना संसर्गाचा धोका जास्त आहे.

अनुचित घटना होऊ नये म्हणून प्रशासनाने विशेष दक्षता घेण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. दरम्यान एका नातेवाईकाने सोमवारी (ता. १) रात्री कुत्रा ट्रॉमा फिरताना, खाटांजवळ जातानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला. दोन श्वान फिरताना व येथील कचरा पेटीतून जैविक कचरा तोंडात घेऊन जातांना दिसत आहेत. कुत्र्याला रेबीज असल्यास तो मानवाला होण्याचा धोका असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते विकास बोंदाडे यांनी व्यक्त केली.

यापुढे असे प्रकार घडणार नाही
कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेकडे वारंवार पत्र देण्यात येतात. वॉर्डात कुत्रे येऊ नये यासाठी सुरक्षा रक्षक तैनात आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत प्रशासनाकडून चौकशी करण्यात येईल. नियमानुसार कारवाई करण्यात येईल. यापुढे असे प्रकार घडणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. 
- डॉ. अविनाश गावंडे,
वैद्यकीय अधिक्षक, मेडिकल, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT