blood sakal
नागपूर

Blood Donor : दात्यांना चहा अन् दोन बिस्किटे ; रक्तदान अनुदानात नाही चाळीस वर्षांपासून वाढ

नॅशनल एड्‌स कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून(नॅको) स्वेच्छिक रक्तदात्यांसाठी पूर्वी ५८.३४ रुपयांचा निधी राज्य रक्त संक्रमण परिषदेला (रारसंपमरा) येत होता.

केवल जीवनतारे ः सकाळ वृत्तसेवा

नागपूर - दात्यांच्या भरवशावर रक्तदानाची चळवळ राज्यभरात उभी झाली. तिचा वटवृक्षही झाला. स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु दात्यांना रक्तदानानंतर १० रुपयांची हाफ चहा आणि दोन बिस्कीटे देतात. नाश्‍त्यासाठी २५ रुपये खर्च करावे, असे आदेश असताना १० रुपयांच्या नाश्‍त्यावर स्वेच्छिक रक्तदात्यांची बोळवण केली जाते.

नॅशनल एड्‌स कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून(नॅको) स्वेच्छिक रक्तदात्यांसाठी पूर्वी ५८.३४ रुपयांचा निधी राज्य रक्त संक्रमण परिषदेला (रारसंपमरा) येत होता. ही परिषद १८ रुपये ४० पैसे कापून उर्वरित

४० रुपये अधिकृत रक्तपेढ्यांना देत होती. रक्तपेढ्यांकडून रक्तदात्यांच्या नाश्‍त्यावर २५ रुपये खर्च करते. तर १५ रुपये रक्तदान शिबिराच्या आयोजनावर दशकापूर्वी खर्च करण्यात येत होता. या अनुदानात वाढ झाली नाही. यामुळेच आजही स्वेच्छिक रक्तदात्यांची १० रुपयांच्या नाश्‍त्यावर बोळवण करण्यात येते. विशेष असे की,

कोरोनानंतर अनुदानच मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे स्थानिक आरोग्य संस्थांच्या रक्तपेढ्यांकडूनच स्वेच्छा रक्तदात्यांच्या नाश्त्याची सोय करण्यात येत असल्याची माहिती पुढे आली. यासंदर्भात सहाय्यक संचालक डॉ. महेंद्र केंद्रे यांच्याशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.रक्तसंक्रमण परिषद प्रभारावर राज्यातील नोंदणीकृत रक्तपेढ्यांमार्फत करण्यात येणारे रक्त संकलन,

रक्ताची तपासणी व त्याचे वितरण यावर राज्य रक्तसंक्रमण परिषदेकडून नियंत्रण ठेवण्यात येते. मात्र डॉ. अरुण थोरात मार्चमध्ये निवृत्त झाल्यानंतर रक्तसंक्रमण परिषदेला सहा महिन्यांपासून पूर्णवेळ सहाय्यक संचालक मिळालेला नाही. यामुळे रक्तदानाची चळवळ राबविणाऱ्या रक्तपेढ्यांना अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या. यामुळेच स्वेच्छा रक्तदात्यांनाही नाश्ता देण्याची वेळ रक्तपेढ्यांवरच आली आहे.

राज्यात २९९ रक्तपेढ्या

राज्यात २९९ रक्तपेढ्या आहेत. यातील अनेक आता बंद झाल्या आहेत. रक्तपेढ्यांमध्ये दरवर्षी सुमारे १४ लाखावर युनिट रक्त गोळा होते. या दात्यांच्या नाश्‍त्यावर सुमारे ३५ कोटी रुपये खर्च होतात. उर्वरित १५ कोटी रुपयांतून शिबिराच्या आयोजना दरम्यान रक्तदात्यांना देण्यात येणारे प्रमाणपत्र, बॅचेस, स्मृतिचिन्ह, वाहतूक खर्च, बॅनरवर खर्च केला जातो. दाते नि:स्वार्थ भावनेने रक्तदान करतात. अशावेळी रक्तदान केल्यानंतरही दाते आनंदी राहावे. पुढील तीन महिन्यानंतर त्या रक्तदात्यामध्ये रक्तदान करण्याची भावना जागृत असावी, हीच काळाची खरी गरज आहे. स्वेच्छेने होणारे रक्तदान, हाच सुरक्षित रक्त व रक्तघटकांचा मुख्य स्रोत आहे, यामुळे रक्तदानाची चळवळ जिवंत राहणार आहे. परंतु नाश्‍त्यावर २५ रुपये खर्च व्हावे असे आदेश असताना १० रुपयांच्या नाश्‍त्यामध्ये हाफ चहा आणि बिस्कीट दिले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT