file photo 
नागपूर

कोरोनाची भीती नको, पण सावधगिरी अवश्य बाळगा : तज्ज्ञांचा ज्येष्ठांना सल्ला 

नरेंद्र चोरे


नागपूर : उपराजधानीत सध्या कोरोनाचे थैमान सुरू असून, या आजाराने ऑॅगस्ट महिन्यात आतापर्यंत तब्बल पावणे दोनशे जणांचा बळी घेतला आहे. उल्लेखनीय म्हणजे मृतांमध्ये जवळपास 50 टक्के लोक ज्येष्ठ नागरिक आहेत. असे असले तरी ज्येष्ठांमध्ये अजिबात भीतीचे वातावरण नाही. सावधगिरी बाळगून स्वतःची योग्य काळजी घेतल्यास कोरोनापासून बचाव करता येऊ शकतो, असे मत तज्ज्ञ डॉक्टर व ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले आहे. 


मार्च महिन्यात लागल्यानंतर लॉकडाउन काळात मृतांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. मात्र लॉकडाउन उघडल्यानंतर लोक घराबाहेर पडू लागल्याने ही संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाने गेल्या नऊ दिवसांत तब्बल पावणे दोनशे जणांचा बळी घेतला आहे. उल्लेखनीय म्हणजे, मृतांमध्ये सर्वाधिक व्यक्ती 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे सध्याचा काळ वयोवृध्दांसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. असे असले तरी ज्येष्ठांनी 'पॅनिक' होण्याचे काहीही कारण नाही. स्वतःची योग्य काळजी घेतली आणि चांगले खानपान, नियमित व्यायाम आणि पुरेशी विश्रांती व झोप घेतल्यास कोरोनापासून सहज दूर राहता येऊ शकते, असे डॉक्टर सांगतात. ज्येष्ठांमध्ये डायबिटीज, ब्लडप्रेशर, संधीवात, स्मृतिभ्रंश व पडण्याचे आजार प्रामुख्याने आढळतात. अशा व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका संभवतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. 


कोरोनाच्या वाढत्या आजाराविषयी बोलताना 84 वर्षीय ज्येष्ठ नागरिक हुकूमचंद मिश्रिकोटकर म्हणाले, कोरोना आल्यापासून आम्ही दोघेही पती-पत्नी पुरेशी काळजी घेत आहोत. पहाटे पाच वाजता झोपेतून उठल्यानंतर अनुलोमविलोम, वॉकिंग, नाश्ता, जेवण, विश्रांती, कॉफी किंवा चहा, सायंकाळी लवकर जेवण, थोडावेळ 'टिव्ही पाहिल्यानंतर झोपण्यापूर्वी हळदीचे दूध घेणे हे आमचे रुटीन आहे. शिवाय मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करतो. इतरांनाही हे करायला सांगतो. या कठीण काळात कुटुंबातील इतरही सदस्यांनी ज्येष्ठांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोरोनापासून बचावाचे काही उपाय 

-ज्येष्ठांनी विनाकारण बाहेर पडू नये 
-नियमित योगा-प्राणायाम व व्यायाम करावा 
-गरम पाणी व काढा प्यावा 
-हळदमिश्रित दूध घ्यावे 
-निंबू-पाणी व कॉफीचे सेवन करावे 
- फळे व ड्राय फ्रुट्स अधिकाधिक खावे 
- हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे 
- पुरेशी विश्रांती व झोप घ्यावी 
- टिव्हीवर मनोरंजनपर कार्यक्रम पाहावे 
- विनाकारण कसलाही ताणतणाव घेऊ नये 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT