Dr. Ashish Deshmukh demands Disha enforcement of the law
Dr. Ashish Deshmukh demands Disha enforcement of the law 
नागपूर

मुख्यमंत्री ठाकरेंकडे ‘दिशा कायदा’ लागू करण्याची मागणी; डॉ. देशमुखांच्‍या मते नागपूरही महिलांसाठी असुरक्षित

राजेश चरपे

नागपूर : नागपूर शहरसुद्धा महिला व मुलींसाठी असुरक्षित झाले आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आंध्रप्रदेश प्रमाणे आपल्या राज्यातसुद्धा महाराष्ट्र दिशा कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये मागील तीन वर्षांत अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात सतत वाढ होत आहे. २०१८च्या तुलनेत २०१९ मधील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा आकडा २१ टक्क्यांनी वाढला आहे. नॅशनल क्राईम ब्यूरोच्या आकडेवारीप्रमाणे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन्स फ्रॉम सेक्शुअल अफेन्सेस (पोक्सो) अंतर्गत नोंद होत असलेल्या गुन्ह्यांमध्ये नागपूर देशात दहाव्या क्रमांकावर आहे.

नागपुरात पोक्सोअंतर्गत २०१९ मध्ये २३१ गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची संख्या १११ होती तर ११७ अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. महिलांवरील अन्यायाच्या गुन्ह्यात नागपूरचा देशात बारावा क्रमांक लागतो. २०१९ मध्ये ११४४ प्रकरणे दाखल करण्यात आलीत, ११५५ महिलांना विविध प्रकारच्या अन्यायाचा सामना करावा लागला. यात लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नाचे २२२ गुन्हे, अपहरणाचे ४०५ गुन्हे आणि पती, सासरच्या लोकांकडून क्रूरतापूर्ण वागणुकीच्या १३६ गुन्ह्यांचा समावेश होता.

असा आहे दिशा कायदा

दिशा कायदा पारित केल्‍यास महिला व अल्पवयीन मुलींसंबंधी गुन्ह्यांचा निकाल २१ दिवसांत लागेल. या नव्या कायद्याअंतर्गत, बलात्कार, सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांना सात दिवसांत चौकशी पूर्ण करावी लागेल, विशेष न्यायालयाला पुढील १४ दिवसांत सुनावणी पूर्ण करावी लागेल. म्हणजेच, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून न्यायालय दोषींना २१ दिवसांत मृत्युदंडाच्या शिक्षेची सुनावणी करू शकते.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT