Dr. Lalit Jadhav Died in Accident Karanja-Amravati Highway esakal
नागपूर

दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टरवरच काळाचा घाला; 108 रुग्णवाहिकेची ट्रकला मागून जोरदार धडक

धनज खु ते धोत्रा जहांगीर दरम्यान उभ्या ट्रकला १०८ रुगणवाहिका चालकाला अंदाज न आल्याने हा भीषण अपघात घडला.

सकाळ डिजिटल टीम

या अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रक चालकाने महामार्गाच्या बाजूला पार्किंग लाईट न लावता हा ट्रक उभा करून ठेवला होता.

कारंजा : कारंजा-अमरावती महामार्गावरील (Karanja-Amravati Highway) धनज खु ते धोत्रा जहांगीर गावा दरम्यान मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात १०८ रुग्णवाहिकेतील डॉ. ललित बाबुसिंग जाधव (Dr. Lalit Babusingh Jadhav) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक नरेंद्र बारसे गंभीर जखमी झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, कारंजाची शासकीय १०८ रुग्णवाहिका (Ambulance) अमरावतीवरून रुग्ण सोडून कारंजाला परत येत असताना मार्गातील धनज खु ते धोत्रा जहांगीर दरम्यान उभ्या ट्रकला १०८ रुगणवाहिका चालकाला अंदाज न आल्याने हा भीषण अपघात घडला. दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी तत्पर असणाऱ्या रुग्णवाहिकेमधील डॉक्टरचा असा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रक चालकाने महामार्गाच्या बाजूला पार्किंग लाईट न लावता हा ट्रक उभा करून ठेवला होता. तसंच या ट्रकला मागच्या बाजूने रेडियम रिफ्लेक्टर नसल्यानं रुग्णवाहिका चालकाला महामार्गावरील हा उभा ट्रक दिसला नाही. याच कारणामुळे हा भीषण अपघात घडला आहे.

या भीषण अपघातामध्ये रुग्णवाहिका ट्रकच्या मागच्या बाजूने आत घुसून चालक कॅबिन पूर्णतः चक्काचूर झालं. या रुग्णवाहिकेला दुसऱ्या ट्रकच्या सहाय्याने बाहेर ओढून डॉक्टर ललित जाधव यांचा अडकलेला मृतदेह बाहेर काढावा लागला. या अपघातास कारणीभूत ट्रक चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. घटनास्थळी धनज बु पोलिसांनी धाव घेऊन मदत केली.

महामार्गावर उभ्या ट्रकला किंवा इतर वाहनांना धडकून आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. अशा घटनांमध्ये कित्येकांचा जीव गेला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झालेत. यासाठी आरटीओ आणि पोलीस विभागाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. धनज बु पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीवरुन पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पिंप्री फॉरेस्ट गावावर पसरली शोककळा

डॉ. ललित हे सेवानिवृत्त प्राध्यापक तथा प्रताप शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाबुसिंग जाधव यांचे चिरंजीव असून त्यांनी बीएएमएस, एम. ए. पीएचडी अशा पदव्या मिळविल्या आहेत. पिंप्री येथील प्रताप शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. १०८ रुग्णवाहिकेवर डॉक्टर म्हणून काम करत होते. सुस्वभावी व रुग्णांसाठी धावून जाणारा माणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अकाली एक्झिटने गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचे मुळगावी पिंप्री फॉरेस्ट येथे त्यांच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाचवीचा कार्यकम २७ मे रोजी संपन्न होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Apology Farmers : संजय राऊतांनी शेतकऱ्यांची माफी मागितली! मंत्री दादा भुसेंनी मालेगाव न्यायालयातील खटला घेतला मागे, दोघांची पत्रकार परिषद

Shivjayanti 2026: आग्रा किल्ल्यात घुमला शिवरायांचा जयघोष! औरंगजेबाच्या दरबारातील 'ती' शौर्यगाथा पुन्हा जिवंत; फडणवीसांनी दिली गुड न्यूज

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीवेळी सांगलीच्या तरुणाचा मृत्यू

शिमग्याला मुंबईहून तळकोकणात फक्त ७ तासात, मार्च महिन्यात १६ रो-रो फेऱ्या; वेळ वाचवणारा आणि आरामदायी प्रवास

Mumbai Local: मुंबईकरांचा मनस्ताप वाढणार! तिन्ही लोकल मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्या आणखी उशिराने धावणार

SCROLL FOR NEXT