Dr. Babanrao Taiwade  sakal
नागपूर

Dr. Babanrao Taiwade : डॉ. बबनराव तायवाडे यांना ‘विदर्भ गौरव’

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्राध्यापक डॉ. बबनराव तायवाडे यांना कृषी विकास प्रतिष्ठानचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘विदर्भ गौरव’ पुरस्कार जाहीर झाला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्राध्यापक डॉ. बबनराव तायवाडे यांना कृषी विकास प्रतिष्ठानचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘विदर्भ गौरव’ पुरस्कार जाहीर झाला. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने स्व. मानिकलाल गांधी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पंचेवीस वर्षांपासून विदर्भाचा लौकिक वाढवणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विजय भटकर, ए.बी. बर्धन, ग्रेस आदींना हा सन्मान मिळाला आहे.

तायवाडे यांनी ओबीसी चळवळ देशभरात पोचवली. शनिवारी (ता.१८मे) श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेत हा पुरस्कार जाणार आहे.

आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार परिणय फुके, आमदार सुधाकर अडबाले हे प्रमुख अतिथी असतील. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता काँग्रेसनगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या मातोश्री विमलताई देशमुख सभागृहात हा सोहळा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya Gold 2026: सोनं वाढेल की घसरेल? ‘भाव पडल्यावर खरेदी’चा मोतीलाल ओसवालचा सल्ला

Iran-Us War: आता काय बिनसलं? होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; कारण सांगत इराणचा कठोर निर्णय

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात झळकणार गायक अतुल गोगावलेचा लेक, गाण्यात दिसली झलक

RCB vs DC: फॉर्ममध्ये असलेल्या बंगळुरूविरुद्ध अक्षर पटेलने जिंकला टॉस! बर्थडे बॉय केएल राहुलकडे असणार लक्ष; पाहा Playing XI

MPSC Success : दगड फोडणाऱ्याची मुलगी झाली अधिकारी! लोणीच्या मोहिनीची महसूल सहाय्यकपदावर झेप; तिचा संघर्ष वाचून डोळ्यात येईल पाणी

SCROLL FOR NEXT