atul londhe  atul londhe
नागपूर

‘ड्रग्ज तस्करांचे भाजप नेत्याशी संबंध; पुरावे देणार’

राजेश चरपे

नागपूर : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीसुद्धा भाजप नेत्यांचे आणि ड्रग्ज तस्करांचे संबंध असल्याचा खळबळजनक आरोप पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी ड्रग्ज तस्करांसोबत भाजपच्याच नेत्यांचे फोटो कसे, असा सवाल उपस्थित करून याची चौकशी करण्याची मागणी केली.

लोंढे म्हणाले, एमएच १२ जेजी ३००० क्रमांकाच्या इनोव्हा गाडीतून ५० लाखांची देवाणघेवाण झाली होती. तीच गाडी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी वापरली आहे. गुजरातमध्ये ती हजार किलो ड्रग्ज सापडले होते. त्‍याच्या दुसऱ्या दिवशी याच गाडीने ड्रग तस्कर के. पी. गोसावी आणि मनीष भानुशाली नावाचे तस्कर गुजरातला गेले होते. तेथे त्यांनी गुजरातमधील मंत्री किरिटसिंग राणा यांची भेट घेतली. ही गाडी कराडमधील असून रवींद्र कदम यांच्या नावावर आहे. मात्र, ते तेथे राहात नाही. त्यामुळे रवींद्र कदम यांना ताब्यात घेतल्यास यातून मोठे रहस्य बाहेर येऊ शकते.

विशेष म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्याच नेत्यांचे ड्रग्ज तस्करासोबत फोटो कसे असा सवाल उपस्थितीत करून लोंढे यांनी भाजप आणि तस्कारांसोबत काहीतरी संबंध असावे अशी शंका व्यक्त केली. आपण याची सविस्तर माहिती आणि पुरावे लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचेही लोंढे यांनी सांगितले.

सुनील पाटील हा समीर वानखेडेशी संबंधित आहे. त्याच्यासोबत भानुशाली, गोसावी आणि मध्यप्रदेशातील नीरज यादव नावाचा व्यक्ती भाजप कार्यकर्त्यांसोबत २२ सप्टेंबरला गुजरातला गेले होते. तेथील मंत्र्यांसोबत त्यांचे फोटोही आहेत. त्याच्या आदल्या दिवशी गुजरातच्या पोर्टवर मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले होते. देशात बंदरातून आलेल्या ड्रग्सची विल्हेवाट त्यांनी लावली असल्याची अशी शंकाही लोंढे यांनी व्यक्त केली.

हे प्रकरण दडपण्यासाठी आर्यन खानला अटक करण्यात आली. त्याच्याकडे ड्रग नव्हते, त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नाही तसेच पंचनामासुद्धा जागेवर करण्यात आला नाही. पंचनामा एनसीबीच्या कार्यालयात करण्यात आला. आता या प्रकरणाला हिंदू-मुस्लिम असा रंग दिला जात असल्याचा आरोपही अतुल लोंढे यांनी केला.

घटनाक्रमाला भाजपचे बळ

ड्रग तस्कर भानुशालीचा व्हिडिओ तीन ऑक्टोबरला व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ‘काम हो गया’ असे तो गुजरातमधील मंत्र्याला सांगताना दिसत आहे. यावरून या सर्व घटनाक्रमाला भाजपचे बळ असल्याचे दिसून येते, असे लोंढे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

Gokul Politics : गोकुळ दूध संघात नवा ट्विस्ट! 'त्या' सहानुभूतीवरून शौमिका महाडिक यांच्यावर 410 सभासदांचा घणाघात; कोल्हापूरच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Rojgar sangam Portal: कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट; १० वी पास ते पदवीधरांना एका क्लिकवर मिळणार सरकारी नोकरी

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT