Due to exposure to corona, Read the decision taken by Mayor Sandeep Joshi 
नागपूर

कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने महापौर संदीप जोशींनी घेतला हा निर्णय, वाचा

राजेश प्रायकर

नागपूर : सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत असताना सोशल डिस्टन्सिंग, मास्क आदीचा वापर करूनही महापौर संदीप जोशी एका कोरोनाबाधित असलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आले. त्यामुळे त्यांनी घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला.

पुढील सात दिवस ते घरी विलगीकरणात राहणार असून बुधवारी सायंकाळनंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीच्या पायाभरणीनिमित्त शहरातही मोठ्‍या प्रमाणात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महापौर संदीप जोशीही बुधवारी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यादरम्यान ते कोरोनाबाधित असलेल्या एका कुटुंबातील व्यक्तीच्या संपर्कात आले. याबाबतही त्यांना बुधवारी सायंकाळी कळले. त्यांनी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी त्यांना घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला.

महापौर संदीप जोशी यांना कोरोनाची लागण झाली नाही. ते उत्तम आहे, अशी माहिती त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर शेअर केली आहे. परंतु पुढील सात दिवस घरीच विलगीकरणात राहणार असल्याचे पोस्टमध्ये नमुद केले आहे. बुधवारी सायंकाळी सातवाजेपर्यंत त्यांच्या संपर्कात जे कुणी आले असेल त्यांनीही घराबाहेर निघू नये, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.

महापालिकेतही काही दिवसांपूर्वी अग्निशमन विभागाचे १४ कर्मचारी पॉजिटिव्ह आढळून आले होते. त्यापूर्वी काही अधिकाऱ्यांना आमदार निवासात विलगीकरणात ठेवण्यात आले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2027: गांगुलीने निवडली टीम इंडियाची Playing XI; रोहित-कोहलीसह ‘या’ खेळाडूंना संधी, पण एका स्टारला थेट केलं OUT

Latest Marathi News Live Update : धानावरील करपा, खोडकिडीच्या संकटावर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

Kothrud Road,:कोथरूडमधील वृक्षतोडीला स्थगिती; पुनर्रोपणासाठी जागा उपलब्ध नाही

Manmad-Indore Railway;मनमाड-इंदूर रेल्वेसाठी ४,९३० कोटींची निविदा; महू-ग्यासपूरखेडी ७२.६६ किलोमीटर मार्ग; ४८ महिन्यांची कामासाठी मुदत

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

SCROLL FOR NEXT