Duty of teachers at border checkposts 
नागपूर

धक्‍कादायक... सीमेवरील चेकपोस्टवर शिक्षकांची ड्यूटी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : कोरोना संकटावर मात करण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुरु केलेल्या आहेत. त्याअंतर्गत आपत्ती व्यवस्थापन म्हणून अनेक चेक पोस्टवर शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये पोलीस,तलाठी यांच्यासह शिक्षकांचा अंतर्भाव करण्यात आल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शिक्षक हा त्याच्या सेवाकाळात शाळेत सहा-तास अध्यापन कार्य करीत असतो. पण, सरकारने त्याची सेवा अधिग्रहित केलेली आहे. त्यामुळे त्याला 12 ते 14 तास अतिरिक्त सेवा द्यावी लागत आहे. यातूनच त्यांना शहर आणि राज्यातील सीमांवर असलेल्या चेकपोस्टवर नियुक्त करण्यात आले आहे. या चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आलेले आहे.

हे एक प्रकारचे शिक्षकांचे अवमूल्यन आहे. यापूर्वीही शिक्षकांना कोरोना रुग्ण असलेल्या परिसरातील नागरिकांची माहिती मिळविण्यासाठी सर्वेक्षणाच्या कामात जुंपण्यात आले होते. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रावर सेवा देण्याचे आदेश देण्यात आले होते. आता चक्क चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करण्याचे काम देण्यात येत आहे. सरकारने याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे शिक्षक संघटनांकडून मागणी करण्यात येत आहे.

कालावधी कमी करावा


शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित करताना त्यांचा सेवाकाळ हा सहा तासांचा ठेवावा; जेणेकरून सेवा प्रभावीपणे करता येईल आणि सुदृढ मानसिकतेने करता येईल. याकरिता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून सावनेर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना मागणी करण्यात आली आहे.
 

शिक्षकांचे अवमूल्यन करू नका


शिक्षकांना शिक्षकांसारखीच वागणूक देण्यात यावी; जेणेकरून त्यांचे अवमूल्यन होणार नाही आणि कामसुद्धा योग्य पद्धतीने होईल. शिक्षक परिषद शासनाला पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहे.
-योगेश बन, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT