ed esakal
नागपूर

नागपुरात तीन ठिकाणी ईडीची छापेमारी, आयझॅक अन् भटेवार अनिल देशमुखांचे निकटवर्तीय?

भाग्यश्री राऊत

नागपूर : ईडीने (ED) आज सकाळी शहरातील शिवाजीनगर भागातील एका व्यावसायिकाच्या घरावर छापा टाकलेला आहे. भटेवार यांची ही सदनिका असून ते अनिल देशमुख (former home minister anil deshmukh) यांच्या जवळचे सहकारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच अन्य दोन ठिकाणीही ईडीने छापेमारी केली आहे. (ED raids on three places in case of anil deshmukh money laundering case in nagpur)

दरम्यान, ईडीच्या दुसऱ्या एका टीमने सदर येथील न्यू कॉलनी भागातील एका इमारतीवर देखील छापा टाकला असून एका बंगल्यामध्ये ही चौकशी सुरू आहे. आयझॅक कुटुंबीयांचा हा बंगला असून समित आयझॅक हे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या जवळचे मानले जातात. मिळालेल्या माहितीप्रमाणे, आज सकाळी साडेसात वाजता ईडीचे तीन अधिकारी न्यू कॉलनी परिसरात आइजेक कुटुंबियांच्या बंगल्यामध्ये दाखल झाले आणि तेव्हापासून आतापर्यंत अधिकारी आतमध्ये असून ईडी कडून ही चौकशी सुरू आहे. याशिवाय नागपुरातील जाफर नगर परिसरातही एका ठिकाणी ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कोल्हापुरात माॅन्सूनचे धडाक्यात पुनरागमन; पुढच्या काही तासांत मुंबईसह अमरावती, कोकणात पावसाचा जोर वाढणार; कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Ketan Agarwal Killed Case : घटनास्थळी प्रसंगाची पुनर्निर्मिती; लोहगडावर पुतळ्याच्या साह्याने गुन्ह्याची अडीच तास पुनर्तपासणी

Anant Ambani : अनंत अंबानी यांची तिरुमलात सुप्रभात सेवा

Iran America War : आखातात पुन्हा भडका! बहारीन, कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ले; अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचे चोख उत्तर

SCROLL FOR NEXT