Anil parab Sakal Media
नागपूर

अनिल परबांचे निकटवर्तीय अधिकारी खरमाटे यांच्यावर ईडीचा छापा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : महाराष्ट्रात ईडीने छापासत्र सुरु केलंय. ईडीने आपला मोर्चा आता नागपूरमध्ये वळवला आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग खरमाटेंच्या निवासस्थानी ईडीची धाड पडली आहे. काल ईडीने अनिल परब यांना नोटीस पाठवल्यानंतर आज परबांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यावर छापा टाकण्यात येतो आहे. खरमाटे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला होता. ईडीने काही कागदपत्रे ताब्यात घेतले आहेत. त्यात काही पुरावे मिळतात का, हे पाहणं निर्णायक ठरणार आहेत. मात्र अनिल परबांकडून धाडसत्राच्या बातम्यांचं खंडन करण्यात आलं आहे.

काल अनिल परब यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली होती. याबाबतची माहिती ट्विट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली होती. अनिल परब यांना आता येत्या मंगळवारी हजर राहण्याचे आदेश या नोटीशीमध्ये देण्यात आले आहेत.

दरम्यान, आज शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर आज ईडीने छापेमारी केली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर ही ईडी चौकशी झाली आहे. ईडीने केलेल्या कारवाईबाबत खासदार भावना गवळी म्हणाल्या, ''भाजपने जुलमी सत्र सुरू केले आहे. मला कुठलीही ईडीची नोटीस आलेली नाही. माझ्या काही संस्थामध्ये ईडीचे अधिकारी आले आहेत. ते चौकशी करत आहेत. आणीबाणीसारखी वागणूक दिली आहे. सर्व शिवसेनेच्या लोकांना टार्गेट केले जात आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs SA W:भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Omprakash Raje Nimbalkar : "१०० कोटी हवेत तर आमच्या किडन्या विकू, पण पक्षांतर करू नका"; उमरग्यातील शिवसैनिकांचे ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना हृदयद्रावक पत्र

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

SCROLL FOR NEXT