Food Oil
Food Oil Sakal
नागपूर

खाद्यतेल २५ रुपयांनी महाग; युक्रेन-रशिया संघर्षामुळे तेलबियांच्या आयातीवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे तेलबियांची आवक प्रभावित झालेली आहे. सलग दोन वर्षापासून खाद्य तेलाचे भाव चढेच असताना केंद्र सरकारने आयाती तेलावरील शुल्क कमी करून भाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केले. मात्र, त्यात यश आले नाही.गेल्या दीड महिन्यात खाद्यतेल प्रतिकिलो २५ रूपयांनी महाग झाले आहे.

दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने खाद्य तेलाच्या आयातीवर परिणाम झाला होता. त्यामुळे सलग दोन वर्षांपासून ग्राहकांना महागाईचे चटके बसत आहेत. ही दर वाढ थांबविण्यास केंद्र सरकारही अपयशी ठरलेले आहे. त्यासाठी त्यांनी तीन वेळा आयातीवरील तेलाच्या शुल्कात कपात केली. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे दर वाढ सुरुच होती. आता युक्रेन आणि रशिया दोन देशात युद्ध सुरु झालेले आहे. या युद्धाचा सोयाबिन तेल आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवर परिणाम होऊ शकतो.

इंधनाच्या दरातही वाढ झाल्याने वाहतूक खर्चही वाढलेले आहे. त्यामुळे खाद्य तेलाच्या आयातीसाठी अधिकची रक्कम मोजावी लागत आहे. या सर्वांचा परिणाम खाद्य तेलाच्या भाववाढीवर होत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांसाठी तेलाची फोडणी अधिकच महागली आहे. गेल्या दीड महिन्यात खाद्य तेलाच्या दरात प्रति किलो २५ रुपयाची वाढ झालेली आहे.

इंडोनेशियाने कच्चे पाम तेलाची निर्यात कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत पाम तेलाचा २० टक्के वापर करण्याबाबत विचार केला जात आहे. तर मलेशियात अद्यापही मजूरटंचाई आणि उत्पादन घटीचे संकट आहे. त्यामुळे पाम तेलानेही विक्रमी दर वाढला आहे. त्याचा फटका भारताला बसू लागला आहे. ब्राझील आणि अर्जेटीनात सोयातेल पुरवठादार देशात यंदा उत्पादन घटलेले आहे. येत्या काही दिवसात खाद्य तेलाचे दर नवा विक्रम करण्याचे संकेत मिळत आहेत.

गव्हाचे दर स्थिर

देशात सध्या तरी गव्हाच्या दरात वाढ झालेली नाही. मात्र, पावसाने हजेरी लावल्यास गव्हाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. युक्रेनवरुन गव्हाची आवक होत असली तरी त्याचा सध्यातरी बाजारावर परिणाम झालेला नाही. भारतात गव्हाचा साठाही खूप असल्याने सध्यातरी गव्हाचे भाव वाढेल असे संकेत नाहीत अशी माहिती नागपूर किरकोळ व्यापरी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Government Apps : आता बनावट अ‍ॅप्सवरुन होणारी फसवणूक टळणार! सरकारी अ‍ॅप्ससाठी गुगल प्ले स्टोअरने घेतला मोठा निर्णय..

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

SCROLL FOR NEXT