नागपूर

अच्छे दिन! खाद्य तेल फक्त सहा रुपयांनी स्वस्त

राजेश रामपूरकर

नागपूर : खाद्य तेलाच्या (Edible oil) आयातीवर लावण्यात आलेले कर कमी होण्याची शक्यता लक्षात घेता दुप्पटीने वाढलेल्या तेलाच्या किंमती प्रति किलोमागे फक्त सहा ते सात रुपये घट (Six to seven rupees less in price) झालेली आहे. खाद्य तेलापाठोपाठ डिझेल आणि पेट्रोलच्या दरांनी ऐतिहासिक विक्रम (Diesel and petrol prices set records) केला आहे. सर्वसामान्य ग्राहकांचा सरकारप्रती वाढत असलेला असंतोष लक्षात घेता खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यात खाद्य खाद्यतेल आयातीवर लावण्यात आलेले कर कमी करण्याबाबत विचार केला जाऊ शकते या वृत्ताने दरात घसरण झाल्याची माहिती आहे. (Edible-oil-is-by-only-six-rupees)

भारतातील ऑइल मिल, किराणा आणि भुसार मालाचे व्यापारी यांच्यासाठी देखील खाद्यतेलाचा साठा करण्याबाबत नवीन दिशानिर्देश जारी केले जाणार आहेत. अत्यावश्यक सेवा कायदा वापरून तेलाच्या किमती कमी करण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत आहे. ती शक्यता लक्षात घेता साठेबाजांनीही साठा बाहेर काढण्याच्याही किनार या दराच्या घसरणीला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती वाढल्यामुळे खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. सरकारी आकडेवारीनुसार सोयाबीन तेलाची किंमत पाच वर्षांमध्ये ८० रुपयांनी वाढून १८० रुपयांपर्यंत पोहोचली. हा गेल्या वर्षभरातील उच्चांकी दर होता. सोयाबीनचे तेल एका वर्षामध्ये ९० रुपयांवरून १८० रुपयांवर रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सूर्यफूल तेलाची देखील अशीच परिस्थिती आहे. सूर्यफूल तेलाची विक्री यापूर्वी ११० रुपये प्रती लिटर होती. आता ते १८० रुपये प्रती लिटर झालेली आहे.

अजून पाच ते सहा रुपयांची घसरण होण्याची शक्यता

जानेवारी महिन्यापासून खाद्य तेलाच्या दरात वाढ सुरू झाली. त्यानंतर सतत भाववाढ सुरूच होती. आठ दिवसांपूर्वी सोयाबीन तेलाचा १५ किलोचा डबा २,५२० रुपयावर होता तो आता २,४२० रुपयांवर आला आहे. शेंगदाणे तेलाचे भावात किंचित घट झालेली आहे. केंद्र सरकारने आयात शुल्क कमी केल्यास भावात अजून पाच ते सहा रुपयाची प्रति किलो घसरण होण्याची शक्यता आहे, असे नागपूर किरकोळ व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

आयातीवरील कर कमी होण्याची शक्यता

भारतात आयात केलेल्या पाम तेलावर १७ टक्के तर सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावर जवळपास २० टक्के कृषी सेस आकारला जातो. हा सेस कमी केल्यास खाद्य तेलाच्या किमती कमी होऊ शकतात. केंद्र सरकार याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

(Edible-oil-is-by-only-six-rupees)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NZ beat SA in SF : दक्षिण आफ्रिका 'Chokers'! न्यूझीलंडचा T20 World Cup फायनलमध्ये प्रवेश, फिन'टॅस्टीक' शतक

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT