education sakal
नागपूर

Nagpur News : तुकडी नसतानाही विद्यार्थी शिकला चौथीपर्यंत

कधी मुख्याध्यापकांच्या खोलीत तर कधी नर्सरीच्या मुलांसोबत शिक्षण

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शाळेत तुकडी नसतानाही शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार प्रवेशित एका विद्यार्थ्याला चौथीपर्यंत शिकविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, पंचायत समितीच्या हद्दीत असलेल्या शाळेत त्याला नर्सरी आणि केजीच्या मुलांसोबत बसवून शिक्षण पूर्ण केले जात असल्याचे चित्र आहे. याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याकडे पालकांनी तक्रार केली आहे.

गोधनी परिसरात एक शाळा असून या शाळेत आरटीअंतर्गत एका विद्यार्थ्याचा क्रमांक लागला. मात्र, कालांतराने या शाळेत चौथीत तो एकटाच शिल्लक राहिला. त्यामुळे नियमानुसार त्याला दुसऱ्या शाळेत प्रवेश देणे आवश्‍यक होते.

मात्र, पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे या शाळेत नेमके किती विद्यार्थी आहेत याची कधीच पाहणी न केल्याचे दिसून आले. त्यातून या विद्यार्थ्याला कधी नर्सरीच्या मुलांसोबत तर कधी मुख्याध्यापकाच्या खोलीत शिकविण्यात येते. याबाबत पालकांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात तक्रार नोंदविली. मात्र,तक्रारीकडेच दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.

विशेष म्हणजे, जिल्हा परिषद प्रशासनाकडून सातत्याने कमी पटसंख्येच्या शाळांची तपासणी केली जाते. त्यातून ज्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होते, तेथील विद्यार्थ्यांचे समायोजन नजिकच्या दुसऱ्या शाळेत केले जाते. मात्र, चार वर्षांपूर्वी आरटीईमध्ये प्रवेश घेतलेल्या शाळेच्या पटसंख्येची माहिती अधिकाऱ्यांना असू नये याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत असून विद्यार्थ्याचाही मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे दिसते.

दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांना प्रकरणाबाबत विचारणा केली असता, माहिती घेऊन सांगते असे त्या म्हणाल्या.

पालकांसोबत या तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांसोबत भेट घेऊन तक्रार केली. विभागाने याची दखल घेत, त्यावर योग्य ती कारवाई करावी.

— शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई ॲक्शन कमिटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Visa Services: भारतीय प्रवाशांना अलर्ट! UAE मध्ये पासपोर्ट आणि व्हिसा सेवा बंद राहणार; जाणून घ्या नेमके कारण

Pune Grand Tour 2027 : पुणे ग्रँड टूर २०२७ अंतर्गत भोर–राजगड–मुळशीतील १७ रस्त्यांसाठी १९७ कोटींची मंजुरी; १३० किमी रस्ते डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार

Latest Marathi Live Updates: वाळूशिल्प साकारून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या

विहिरीत उतरल्यावर समोर आली भूतकाळातील धक्कादायक रहस्ये! पाहा कसा आहे 'घबाड-कुंड' चित्रपट?

Mumbai Electricity: मुंबईत रिंग नेटवर्क उभारणार, १५ हजार कोटींचा खर्च; वीजपुरवठ्यासाठी टाटा पॉवरचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT