Education Officer Wanjari said teacher should eat first food 
नागपूर

आता विद्यार्थ्यांना होणार नाही विषबाधा!, शिक्षणाधिकाऱ्यांनी केली ही सूचना...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी अनेक प्रयोग करण्यात येत आहे. विद्यार्थी वर्षभर शाळेत यावा आणि बसावा यासाठी मध्यान्ह भोजन देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, याच मध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. शाळा व्यवस्थापनाचे या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष नाही. विद्यार्थ्यांना विषबाधा होऊ नये म्हणून आधी शिक्षकांनी भोजन खाऊन बघावे, अशी सूचना शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केली आहे. 

शहर व ग्रामीण भागात या योजनेअंतर्गत सुमारे 2,810 शाळा आहेत. ग्रामीण भागामध्ये या योजनेस पात्र एक लाख 31 हजारांवर विद्यार्थी आहेत. शहरी भागात दोन लाख 15 हजारांवर विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. काही दिवसांपूर्वी हुडकेश्‍वर मार्गावरील मुडे हायस्कूल येथील 32 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली होती. बचत गटाचे कंत्राट रद्द करण्यासोबतच त्यांची पोलिस तक्रार करण्यात आली आहे.

या प्रकरणाची चार अधिकाऱ्यांच्या पथकाकडून चौकशीही करण्यात येत आहे. या गंभीर प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. भोजनाबाबत विशेष दक्षता घेणे व त्याचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. त्यानुसार मधान्ह भोजन शिजविण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल धान्य, भाजीपाला व इतर वस्तू स्वच्छ करूनच वापराव्यात. आहार शिजविण्याच्या ठिकाणी प्राणी, पक्षी, कीटक यांचा वावर राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. भोजनाचे ताट स्वच्छ धुतलेले असावेत. आहाराचे भांडे झाकून ठेवावेत, स्वयंपाकगृहाभोवतालचा परिसर स्वच्छ असावा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. 

...तर कठोर कारवाई

स्वयंपाकी निरोगी व स्वच्छतेची आवड असणारे असावे. विद्यार्थ्यांना भोजन देण्यापूर्वी शिक्षकांनी ते खाऊन बघावा. विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यानंतर काही वेळेपर्यंत विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवावे. यानंतरही असा प्रकार घडल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी शाळांना दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT