file photo 
नागपूर

मीटर वाचन सुरू; लवकरच मिळणार वीजबिल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूर शहर, ग्रामीणसह वर्धा जिल्ह्यात वीजमीटरचे वाचन आणि बिलवाटपाला शासनाकडून परवानगी मिळाली आहे. त्यानुसार मीटर वाचन आणि बिलाची प्रिंटिंगही सुरू झाली आहे. लवकरच ग्राहकांच्या घरी अचूक वीजबिल पोहोचणार असल्याची माहिती महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली. 

कोरोनाच्या पार्भूमीवर मार्च महिन्यापासून मीटर वाचन तसेच बिलाचे प्रिंटिंग आणि वितरण थांबविण्यात आले होते. महावितरणच्या मोबाईल ऍपवर स्वत: रीडिंग पाठविणाऱ्या ग्राहकांना वास्तविक तर उर्वरितांना सरासरी वीजबिल एसएमएसव्दारे पाठविण्यात येत होते. राज्य सरकारकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार महावितरण मुख्य प्रशासनाने जारी केलेल्या निर्देशाच्या अधीन राहून सोशल डिस्टन्सिंग नियमाचे काटेकोर पालन करत, वीज ग्राहकांना आपल्या वीजवापराचे अचूक वीजबिल देण्यासाठी मीटर वाचन, बिल प्रिटिंग आणि वीजबिलाचे वितरण करण्यात येणार आहे. 

मीटर वाचन आणि वीजदेयकाचे वाटप करण्याऱ्या कर्मचाऱ्यांनी हॅंडग्लोज, चेहऱ्यावर मास्क बांधणे, सोबत सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. महापालिकेने कंटेन्मेंट झोन वगळता इतरत्र काम करण्याची परवानगी महावितरणला दिली आहे. त्यानुसार, कंटेनमेंट झोन असणाऱ्या भागात सध्या मीटरवाचन अथवा वीज देयकाचे वितरण होणार नाही.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT