coal  coal
नागपूर

‘वॉश कोलमुळे वीज उत्पादन वाढले’

वॉश कोलच्या वापरामुळे दैनंदिन उत्पादन करण्याकरिता लागणाऱ्या विजेचा व तेलाची खपत कमी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वॉश कोलच्या वापरामुळे दैनंदिन उत्पादन करण्याकरिता लागणाऱ्या विजेचा व तेलाची खपत कमी होण्यास मदत झाली. तसेच वीज उत्पादनाची कार्यक्षमतासुद्धा वाढल्याचा दावा खापरखेडा महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंत्यांनी केला आहे.

जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी वॉश कोलमुळे वीज निर्मितीत कुठलीही वाढ झाली नसल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. पुराव्यादाखल खापरखेडा औष्णिक केंद्राच्या अभियंत्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत दिलेल्या आकडेवारीची प्रत सादर केली होती.

याचा खुलासा करताना मुख्य अभियंत्यांनी वॉश कोलचा शंभर टक्के वापरामुळे उपलब्धता, लोडॲबिलीटी व प्लांट लोड फॅक्टर वाढण्यास मदत होते तसेच कोळशाची खपत ही कमी झाल्याचे दिसून येते, असे सांगितले आहे. कोराडी औष्णिक वीज निर्मिती येथे शंभर टक्के वॉश कोलचा वापर केल्यामुळे वीज निर्मिती मध्ये वाढ झाली आहे.

खापरखेडा येथील संचात २०१२-१३ ते २०२०-२०२१ या कार्यकाळात वॉश कोलचा वापर करण्यात आला नाही. एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत वॉश कोलचा वापर सुमारे २,७७,४४४ मेट्रिक टन इतका करण्यात आला. एप्रिल ते डिसेंबर २०२१ या कालावधीत रॉ कोलचा वापर हा १८,५०,००६ मेट्रिक टन इतका करण्यात आला. वॉश कोल व रॉ कोलचा वापर एकूण २१,२७,४४९ मेट्रिक टन करण्यात आला. कोळश्याच्या तुटवडा निर्माण झाल्या मुळे एप्रिल ते डिसेंबर २०२१ या कालावधीत एकूण वापरलेल्या कोळश्याच्या केवळ १३.०४ टक्के वॉश कोलचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, बैठकांना सुरुवात; 'हे' 5 मुद्दे गाजणार

रेल्वे पुनर्वसन प्रकल्पासाठी जागा मोकळी करणे आवश्यक; गणेश नगर-मेघवाडी कारवाईवर DRP चं स्पष्टीकरण

Mrunal Thakur Yashasvi Jaiswal Dating Rumours: यशस्वी जैस्वालसोबत डेटिंगच्या चर्चांवर मृणाल ठाकूरचं मौन अखेर तुटलं; म्हणाली, “Gen Z...”

Solar Scheme Scam: पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या नावाखाली १२ लाखांहून अधिकांची फसवणूक; राजेंद्र बोहाडेवर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गोकुळकडून दूध उत्पादकांना मोठा दिलासा; म्हैस अन् गाय दूध खरेदी दरात वाढ

SCROLL FOR NEXT