Eleven hundred farmers returned one crore to the Center 
नागपूर

अकराशेवर शेतकऱ्यांनी केंद्राला परत केला ‘सन्मान’; एक कोटी जमा झाल्याची माहिती

नीलेश डोये

नागपूर : करदाते, नोकरदार असलेल्या अकराशेच्या वर शेतकऱ्यांनी खात्यात जमा झालेला शेतकरी सन्मान निधी केंद्र सरकारला परत केला आहे. ही रक्कम सुमारे एक कोटी आहे.

कर्ज तसेच ऊन-पावसाच्या फटक्यातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ दोन वर्षांपूर्वी शेतकरी सन्मान योजना सुरू केली. प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे तीन टप्प्यांमध्ये एकूण सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांना दिले जातात. ही रक्कम सात-बारावर नाव असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही योजना जाहीर केली होती. ती राबविण्यासाठी शासकीय यंत्रणेला पुरेसा वेळ मिळाला नसल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यामुळे सात-बारावर ज्यांची नावे आहेत, त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जात आहे. यात धनाढ्य शेतकरी, व्यावसायिक शेतकरी तसेच नोकरदार शेतकऱ्यांचाही समावेश आहे.

नागपूर जिल्ह्यात दोन लाख ९ हजार ३३६ शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत पैसे वळता करण्यात आले आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून काही निकष निश्चित करण्यात आले. निकषात बसत नसलेल्या शेतकऱ्यांकडून दिलेले पैसे परत घेण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले. जिल्ह्यात चार हजार ७१२ शेतकरी निकषात बसत नसल्याचे समोर आले.

या शेतकऱ्यांना २० हजार ३६ हप्त्यांचे चार कोटी ७२ हजार रुपये देण्यात आले. निकषात बसत नसलेल्या शेतकऱ्यांना पैसे परत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पैसे परत न केल्यास थेट बँकेतून पैसे वळते करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला होता. अपात्र ठरविण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी पैसे परत करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत १,१६७ शेतकऱ्यांनी एक कोटी सहा लाख ८६ हजार रुपये परत केल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे.

गरीब, आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी योजना

गरीब व आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. त्यांनाच याचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा सरकारची आहे. नोकरदार व करदात्यांच्या नावावर शेती आहे. त्यांना खरेतर वर्षाला सहा हजार रुपयांची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांनीच सन्मानपूर्वक पैसे परत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याला काही प्रामाणिक शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला, ही चांगली बाब असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात वाहतुकीत मोठे बदल, अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्ग कोणते? खरेदीला गेल्यावर पार्किंग कुठे करायचं? वाचा सविस्तर अपडेट्स

Viral Video: डीजेचा दणदणाट नव्हता, लेझीम-टिपरीचा जल्लोष होता; पाहा १९९१ मधील पुण्याची पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणूक

Jat Municipality Photo Dispute : जत पालिकेची सभा छायाचित्राच्या वादात; मुख्यमंत्री-आमदारांच्या फोटोवरून जोरदार खडाजंगी, काँग्रेसचा सभात्याग

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Borkhind Samruddhi Highway Interchange : नाशिकला समृद्धी महामार्गाचा थेट फायदा! बोरखिंड इंटरचेंजला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 343 कोटींचा निधी जाहीर

SCROLL FOR NEXT