Where eleven students are taking admission 
नागपूर

हे काय! ग्रामीण भागातील कॉलेज जोमात,, विद्यार्थ्यांचा वाढता कल.. पण कारण काय.. वाचा

मंगेश गोमासे

नागपूर : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाने ग्रामीण विभागातील महाविद्यालयांचे चांगलेच फावले असून विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ग्रामीण महाविद्यालयात गर्दी केली आहे.

कोरोनामुळे दहावीचा निकाल यंदा बराच उशिरा लागला. त्यामुळे यावर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली. यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यानी अकरावीचे प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यापेक्षा ग्रामीण भागात प्रवेश घेणे विद्यार्थ्याने पसंत केले आहे. विशेष म्हणजे क्‍लासेसनेही ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांशी "टाय-अप' केले आहे. या प्रकाराने क्लासेसमधील विद्यार्थी या महाविद्यालयात प्रवेशासाठी गर्दी करताना दिसून येत आहे.

विशेष म्हणजे या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना जायचेच नसल्याने क्‍लासेसचे चांगलेच फावले आहे. ही बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास असतानाही, यावर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात येणारी ऑनलाइन प्रक्रिया शहरापूरती मर्यादित राहणार आहे. त्यामुळे यावर्षीही शहरातील नामवंत महाविद्यालयांना प्रवेशाचा फटका बसणार आहे.

एनएमआरडीए अंतर्गतच्या समावेश करावा

अकरावी प्रवेश प्रक्रियेत गेल्या वर्षी 21 हजारावर जागा रिक्त राहील्या होत्या. सध्या ही प्रक्रिया महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी राबविण्यात येते. त्यामुळे क्‍लासेसशी टायअप असल्याने ग्रामीण भागात असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेत असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे सुविधा नसताना मोठ्या प्रमाणात प्रवेश देण्यात येतात. या प्रकारानेच शहरातील बऱ्याच अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त राहत असल्याचे दिसून आले आहे. तसेच बऱ्याच प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होताना दिसून येत आहेत.


विशेष म्हणजे पुणे आणि मुंबईत पीएमआरडीए आणि एमएमआरडीएअंतर्गत येते. त्यामुळे नागपुरात महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील जागांसाठी प्रक्रिया न राबविता एनएमआरडीएअंतर्गत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश करावा अशी मागणी राज्य संस्थाचालक महामंडळाने केला आहे.

क्‍लासेस ठरवितात प्रवेश

दहावीच्या परीक्षानंतर बारावीनंतरचे करिअर म्हणून खासगी शिकवणी वर्गाकडे पालकांची धाव असते. त्यामुळे महाविद्यालय कुठले असले तरी, शिकवणी वर्ग टॉपचे असावे असाच जवळपास पालकांचा कल असतो. त्यामुळे अकरावीपूर्वीच खासगी ट्युशन क्‍लासेसमध्ये पालकांची गर्दी असते. याचाच फायदा घेत, शिकवणी वर्ग घेणाऱ्या संस्थाच कुठला विद्यार्थी कुठे प्रवेश घेईल हे ठरते.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT