Emotional instability in girls due to constraints 
नागपूर

संशोधनाचा निष्कर्ष! बंधनांमुळे मुलींमध्ये भावनिक अस्थिरता; १३ ते १६ वर्ष वयोगटाचा समावेश

मंगेश गोमासे

नागपूर : सातच्या आत घरात, हे करू नको, मुलांशी बोलू नकोस, जास्त वेळ बाहेर फिरू नकोस अशी अनेक बंधने मुलींवर आजही लादली जातात. या बंधनामुळेच मुलांच्या तुलनेत मुलींची भावनिक स्थिरता कमी येत असल्याचा निष्कर्ष एका पीएच.डीच्या संशोधनातून समोर आला आहे. त्यानुसार १३ ते १६ या वयोगटातील ४४ टक्के मुलींमध्ये भावनिक स्थिरता कमी असल्याचे दिसून आले आहे.

आज कुठल्याही क्षेत्रात मुली मागे नाही. मात्र, त्यांच्यावर घरची बंधने अधिक असल्याचे दिसून येतात. त्यातूनच अनेक प्रश्नांची निर्मिती होताना दिसून येते. प्रेम आणि चिंतेमुळे मुलांच्या तुलनेत मिळणाऱ्या वागणुकीमुळे मुलींमध्ये अपयश, निराशेची भावना आणि न्यूनगंड तयार होत असतो. विशेषतः १३ ते १६ या वयोगटातील मुले वयात येत असताना, त्यांच्या मनावर त्याचा जास्त परिणाम झाल्याचे दिसून येते. याचा अभ्यास करण्यासाठी शोभना नीरज सुकारे यांनी गृहअर्थशास्त्र शाखेत ‘पालक-बालक संबंधाचा मुलांच्या स्वसंकल्पनेवर व भावनिक स्थिरतेवर होणाऱ्या परिणामाचे अध्ययन' या विषयावर शोधप्रबंध सादर केला.

त्यासाठी त्यांना डॉ. वैजयंती देशपांडे यांचे मार्गदर्शन मिळाले. या शोधप्रबंधात त्यांनी पालक-बालक संबंध, स्वसंकल्पना आणि भावनिक स्थिरतेवर अभ्यास केला. या वयोगटातील मुलामुलींमधील भावनिक स्थिरता हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. त्यात प्रामुख्याने मुलांमध्ये ६५ टक्के तर मुलींमध्ये ५६ टक्के भावनिक स्थिरतेचे प्रमाण आढळून आले. 

शिक्षित पालक तरीही

जे पालक पदव्युत्तर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षित असतात, त्यांच्या मुलांमध्ये भावनिक स्थिरता कमी असल्याचे दिसते. त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या अपेक्षा मुलांवर लादण्याने मुलांमध्ये निराशा आणि अपयशाची भावना निर्माण होत असते. याउलट कमी शिक्षित पालकांच्या मुलांमध्ये त्याचे प्रमाण अधिक असते. उत्पन्नाचा विचार केल्यास ज्यांचे उत्पन्न कमी त्यांच्या मुलातही भावनिक स्थिरता कमी असल्याचे दिसून येते. कारण इतर मुलांकडे असलेल्या सोयी-सुविधा देण्यात पालक कमी पडतात.

भावनिक स्थिरता म्हणजे काय? 

भावना म्हणजे व्यक्तीची उत्तेजित, मनोवैज्ञानिक व शारीरिक स्थिती होय. त्यामध्ये शारीरिक किंवा शक्तीशाली भावना, एखादे निश्चित उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी स्पष्ट स्वरूपात वृद्धिंगत पावते. ती कमी झाल्यास निराशा आणि वाढल्यास योग्य निर्णय घेता येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपुरात एकाच कुटुंबातील ५ जण बेपत्ता, शेवटचं लोकेशन पुणे; १० दिवसांपासून शोध सुरू

Ketan Agrawal Case : पुण्यातील लोहगड केतन अग्रवाल प्रकरणानंतर 'राष्ट्रीय पुरुष आयोग' स्थापन होणार?, राज्यसभेत पडसाद; भाजप खासदारांकडून मागणी

Marathi Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये बुद्ध लेणी परिसरातील धबधबा पुन्हा प्रवाहित

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

SCROLL FOR NEXT