Employee beaten up by a trainee doctors in super speciality 
नागपूर

Video : 'मी डॉक्‍टर आहे मला लवकर कार्ड दे' अस म्हणत घातला वाद अन्‌... 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कर्मचारी शरद साबळे हा सकाळी आईला उपचारासाठी घेऊन आला. यानंतर मेडिकलचे प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर कार्ड काढण्यासाठी सुपर स्पेशालिटीत आले. "मी डॉक्‍टर आहे मला लवकर कार्ड घा' असे डॉक्‍टरने म्हटले. यावर शरद साबळेने लाईमध्ये लागायला सांगितले. यावर चिडलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरने अन्य चार ते पाच जणांसोबत येत शरद साबळेला खिडकीतून ओढून मारहाण केली. ही घटना मंगळवारी घडली. 

सुपर स्पेशालिटीचा कर्मचारी मंगळवारी सकाळी आईला उपचारासाठी घेऊन आला. यानंतर तो आपल्या कामाला लागला. काही वेळांनी मेडिकलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर कार्ड काढण्यासाठी सुपर स्पेशालिटीत आला. "मी डॉक्‍टर आहे मला लवकर कार्ड घा, काम आहे' असे तो बोलू लागला. यावर शरदने प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरला लाईमध्ये येण्यास सांगितले. मात्र, त्याने शरदशी वाद घातला. 

यानंतर प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर निधून गेला. काही वेळानी तो परत चार ते पाच जनांसह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आला. वादावरून शरद साबळेला सर्वांनी मारहाण केली. "तू चतूर्थ कर्मचारी आहे. माझ्याशी असा कसा बोलला' असे म्हणत मारहाण केली. शरदला मारहाण होत असल्याचे पाहून अन्य कर्मचारी धाऊन आले. त्यांनी प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांच्या तावडीतून शरदची सुटका केली. 

कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

आपल्या कर्मचाऱ्याला मारहाण झाल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्‍त केला. संतप्त कर्मचाऱ्यांनी अधिष्ठाता सजल मित्रा यांच्या कक्षासमोर घेराव घातला. तसेच कामबंद आंदोलन पुकारले. कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाणे गाठले. कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT