Nagpur Crime sakal
नागपूर

Nagpur Crime : अभियंत्याची तीन कोटींनी फसवणूक ; पती-पत्नीसह दहा जणांवर गुन्हे दाखल

ठगबाजांच्या टोळीने एका वृद्ध अभियंत्याला पैसे गुंतवणुकीचे आमिष दाखवून ३ कोटी १७ लाखांनी फसवणूक केली. त्यांच्या नातेवाइकांनाही नोकरी मिळवून देण्याची थाप मारून पैसे उकळले. तक्रारीवरून पोलिसांनी पती-पत्नीसह १० आरोपींवर गुन्हे नोंदविले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ठगबाजांच्या टोळीने एका वृद्ध अभियंत्याला पैसे गुंतवणुकीचे आमिष दाखवून ३ कोटी १७ लाखांनी फसवणूक केली. त्यांच्या नातेवाइकांनाही नोकरी मिळवून देण्याची थाप मारून पैसे उकळले. तक्रारीवरून पोलिसांनी पती-पत्नीसह १० आरोपींवर गुन्हे नोंदविले आहे. दाम्पत्याला अटकही करण्यात आली.

तानबा इंदूरकर असे पीडित आहेत. वैशाली ऊर्फ क्रिशा विश्वनाथ शेट्टीगार ऊर्फ वैशाली सुदर्शन एनैवार, सुदर्शन संजय एनैवार, सिद्धार्थ संजय एनैवार तिन्ही रा. एसई रेल्वे कॉलनी, प्रतापनगर आणि शाहनवाज फिर्दोस खान रा. रमाईनगर, नारी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

फरार आरोपी सोनाली एनैवार, विशाल विश्वनाथ शेट्टीगार, अविनाश नंदा, निशा नंदा, कृणालकांत सरवारी आणि सीमा कोथे यांचा शोध सुरू आहे. इंदूरकर हे परदेशात अभियंता होते. निवृत्तीनंतर ते नागपुरात स्थायिक झाले. सीमा कोथे ही वैशालीसाठी सावज शोधण्याचे काम करते. २०१८ मध्ये दोघींनीही इंदूरकर यांना जाळ्यात अडकवले.

इंदूरकर यांचा मुलगा प्रकाश, सून रश्मी, पुतण्या कृपासागर आणि नातेवाईक अनुप जनबंधू यांना सेल्स टॅक्स विभागात नोकरी लावून देण्याची थाप मारली. वैशालीने सांगितले की, तिचा पती सुदर्शन हा सेल्स टॅक्स विभागात आयुक्त आहे. त्याच्या शिफारशीवर चौघांनाही नोकरी मिळू शकते. त्यासाठी त्यांनी इंदूरकर यांच्याकडून मोठी रक्कम घेतली.

त्यानंतर आरोपींनी इंदूरकर यांना सेल्स टॅक्स विभागाने जप्त केलेली मालमत्ता मिळवून देण्याची थाप मारली. एका वर्षात गुंतवलेली रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून त्यांचे भूखंड आणि दागिनेही विकायला लावले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर इंदूरकर यांनी पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांच्याकडे तक्रार केली. पोलिसांनी तपास करून चौघांना अटक केली तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: तमिळनाडूमध्ये सत्तेचा मोठा खेळ उलटला? विजयच्या पक्षाने सर्वांनाच दिला धक्का

Vijay Thalapathy TVK Party : विजय थलपथीचा तामिळनाडूच्या राजकारणात 'मास्टर' स्ट्रोक! पहिल्याच निवडणुकीत मोठी आघाडी

Pune Crime : पुण्यात सासऱ्याकडून सुनेची हत्या, ६ महिन्यांच्या बाळासमोरच भिंतीवर डोकं आपटलं अन्...

Tamil Nadu Election Result Update : लाडक्या बहिणींनी विजय थलपतीला तारलं, लग्नात मुलींना मिळणार आता ८ ग्रॅम सोने; थलपतीचा महाराष्ट्र पॅटर्न चर्चेत

Nagpur News: ट्रांझिट बेलनंतरही अटकपूर्व जामिनाचा हक्क नाही; उच्च न्यायालय : बहुचर्चित किडनी विक्री प्रकरणात डॉ. सिंगला दणका

SCROLL FOR NEXT