file photo 
नागपूर

आईबाबा, मी दुनियेत नसलो तर... असा प्रश्‍न विचारून अभियंत्याने केले हे...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सिद्धांत हा आईवडिलांसह राहायचा. आईवडील सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आहेत. त्याला एक बहीण असून, ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) वैद्यकीय अभ्यासक्रमाला आहे. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण नुकतेच पूर्ण केले. तो नोकरीच्या शोधात होता. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर झाले. यामुळे अनेक कंपन्यांनी मनुष्यबळात कपात करायला सुरुवात केली. त्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी बंद झाल्या. आता आपल्याला नोकरी मिळणार नाही, असे त्याला वाटायचे. त्याचा ताण सिद्धांतने घेतला. 

कोरोनामुळे आता उच्चशिक्षित असूनही नोकरी मिळणार नाही, असे टेन्शन घेतल्याने नैराश्‍यात सापडलेला युवा अभियंता सिद्धांत संजय कडू (22, रा. अर्चित पॅलेस, नरेंद्रनगर) याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बेलतरोडी पोलिस ठाण्यांतर्गत शनिवारी उघडकीस आली. 

गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड तणावात होता. शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर रात्री 11 ते 12 दरम्यान त्याने स्वत:च्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे 4 वाजेच्या सुमारास त्याचे वडील संजय भीमराव कडू हे उठले असता त्यांना सिद्धांतच्या खोलीचा दरवाजा लोटलेला दिसला. त्यांनी डोकावून बघितले असता त्यांना सिद्धांत गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. वडिलांनी ताबडतोब डॉक्‍टरांना बोलावले. डॉक्‍टरांनी तपासून सिद्धांतला मृत घोषित केले. 

जर मी नसलो तर... 
सिद्धांतने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात त्याने 'आईबाबा, तुम्ही प्रेमाने राहा. मी आत्महत्या करीत आहे. मला माफ करा,' असे लिहिलेली सुसाइड नोट दिसली. दोन दिवसांपूर्वी जेवण असताना त्याने आईवडिलांना 'मी जर या दुनियेत नसेल तर तुम्हाला काय फरक पडेल?' असा प्रश्‍न केला होता. त्यावेळी आईवडील त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही, अशा शब्दात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : एमपीएससी सचिवांना काळं फासल्याप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

SCROLL FOR NEXT