Sanjay Raut on Nagpur Visit  e sakal
नागपूर

Enough is Enough! अंत पाहू नका, राऊतांचं ट्वीट

मातोश्री निवास्थानासमोर हनुमान चालिसाचे पठण करण्यावर राणा दाम्पत्य ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : हनुमान चालिसा पठनावरून शिवसेना (Shivsena) आणि राणा दाम्पत्यांमधील वाद मोठ्या प्रमाणात वाढल असून, मातोश्री निवास्थानासमोर हनुमान चालिसाचे (Hanuman Chalia) पठण करण्यावर राणा दाम्पत्य ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर. दुसरीकडे राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी हजारो शिवसैनिक जमा झाले असून, खार येथील राणा यांच्या घराबाहरे शिवसैनिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. या सर्वांमध्ये शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत राणा दाम्पत्याला आणि भाजपला इशारा दिला आहे. (Sanjay Raut Tweet)

राऊत यांनी ट्वीट करत Enough is Enough! आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी... जय महाराष्ट्र!! असे म्हणत थेट इशारा दिला आहे. याशिवाय तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही असा इशारादेखील शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे. (Navneet Rana News)

"कोणाच्यातरी पाठबळात तुम्ही मुंबईत येऊन आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक स्वस्थ बसतील का? कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी तुम्हा आम्हाला सांगू नका, ते काय आहे सरकारने काय कराव हे सल्ले तुमच्याकडून घेण्याइतक भिकारपण महाराष्ट्राला आलेलं नाही. हिंमत नाही घुसण्याची, बदनाम करताय, कोण तुम्ही? तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे राहा. तुम्ही लक्ष्मणरेषा ओलांडाल तर मग शिवसैनिकांना सुध्दा चिडून तुमच्या घरापर्यंत घुसण्याचा अधिकार त्यांना आहे." असे संजय राऊत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Junnar News : जुन्नर तालुक्यातील रस्त्यांना कायदेशीर ओळख; सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक पहिले गाव

SCROLL FOR NEXT