Historical Images of Shivaji Maharaj  sakal
नागपूर

Historical Images of Shivaji Maharaj : शिवरायांच्या ऐतिहासिक प्रतिमेचे काय होणार? ; शिवप्रेमींना सतावतेय चिंता

मध्य नागपुरातील सुभाष रोडवरील ''शिवराज फाईन आर्ट लिथो-ऑफसेट वर्कस्'' च्या इमारतीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारुढ भव्य प्रतिमा इमारतीवर स्थापित एकमेव प्रतिमा आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मध्य नागपुरातील सुभाष रोडवरील ''शिवराज फाईन आर्ट लिथो-ऑफसेट वर्कस्'' च्या इमारतीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारुढ भव्य प्रतिमा इमारतीवर स्थापित एकमेव प्रतिमा आहे. पण आता इमारत मोडकळीस आली असून प्रतिमेच्या अस्तित्वाबाबत शिवप्रेमींना चिंता वाटत आहे.

चित्र सम्राट व लिथो आर्टिस्ट दत्ताजी रामजी उपाख्य दादासाहेब धनवटे यांनी ''शिवराज लिथो वर्क्स'' या मुद्रणालयाची स्थापना ११ मे १९२१ रोजी केली होती. नंतर विस्तारित तीन मजली क्लॉक टॉवर इमारत उभारली गेली. दादासाहेब धनवटे यांनी शिवरायांची भव्य प्रतिमा नागपुरात स्थापित असावी.

ही इच्छा १९४७ साली जेष्ठ चिरंजीव वसंतराव उपाख्य बाबुरावजी धनवटे यांच्याकडे व्यक्त केली. त्यांनी दिल्लीतील प्रख्यात शिल्पकार सदाशिवराव साठे यांना जबाबदारी दिली.काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी सर्वच राजकीय नेते शहरात असताना प्रतिमेचे लोकार्पण सोहळा ६ जानेवारी १९५९ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले.

राज्यपाल श्री प्रकाश, मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, दादासाहेब धनवटे, बाबुराव धनवटे, नागपूरकर भोसले राजघराण्यातील मान्यवर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यावेळी उपस्थित होते. अशा ऐतिहासिक पुतळ्याच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आज मुद्रणालय शेवटच्या घटका मोजत आहे. मध्यंतरी ही प्रतिमा गांधीसागर येथे बेट बनवून स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव होता. त्याला सर्वांची पसंती होती. पंरतु ही प्रतिमा महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारित असल्यामुळे तिच्या अस्तित्वाचा निर्णय शासनाच्या अधिकारात येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांनो सावधान! आठव्या वेतन आयोगाच्या नावाखाली व्हॉट्सअ‍ॅप स्कॅम; सरकारकडून आवाहन

Mumbai Viral Video: मुंबईत 2BHK फ्लॅटचं भाडं किती, इन्फ्लुएंसर तरुणीने सांगितला थक्क करणारा आकडा

Pune Crime : आरोपींची भूमिका गौण असल्याचा दावा दिशाभूल करणारा, शरद मोहोळ खून प्रकरणात सरकार पक्षाचा युक्तिवाद; चार आरोपींचा जामिनासाठी अर्ज

खरे मूर्ख तर आम्ही... अंकिता वालावलकरने सांगितली सुरजची स्ट्रॅटेजी; त्याने स्वतःला मुद्दाम गरीब दाखवलं...

Maharashtra SSC Exam 2026: दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात; विद्यार्थ्यांनो, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

SCROLL FOR NEXT