Relationships
Relationships  sakal
नागपूर

नागपूर : प्रेयसीला सोडून ‘लिव्ह इन पार्टनर’चे पलायन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मैत्रिणीच्या लग्नाला गेलेली युवती तीन दिवसांत तेथील युवकाच्या प्रेमात पडली. अगदी तीन महिन्यांच्या ‘लव्ह स्टोरी’नंतर दोघांनी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर युवकाने तिला सोडून पलायने केले. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. शारीक अन्वर शेख पठाण (२१, रा. राळेगाव, यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १९ वर्षीय मुलगी रिया (बदललेले नाव) खरबी परिसरात राहत होती. ती गेल्या एप्रिल २०१९ मध्ये मैत्रिणीसह यवतमाळला लग्नाला गेली होती. तीन दिवस लग्नात एन्जॉय करीत असतानाच लग्नात आलेल्या शारिक अन्वरशी तिची ओळख झाली. दोघांची त्याच लग्नात मैत्री झाली. एकमेकांचे फोन नंबर मिळाल्यावर दोघांची चॅटिंग सुरू झाली. रिया नागपुरात एका कंपनीत काम करीत होती तर तोसुद्धा खासगी नोकरी करीत होता. दोघेही एकमेकांच्या फोनवरून संपर्कात होते. दोघेही प्रेमात पडल्यानंतर तो रियाच्या भेटीला नागपुरात यायला लागला.

दोघेही सोबत वेळ घालवायला लागले. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. रियाने त्याला आपल्या आईवडीलांशी ओळख करून दिली. तसेच याच्याशी लग्न करण्याचा निर्णयही कळविला. परंतु, शारीकच्या आईवडीलांनी लग्नास विरोध दर्शविला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपूर्वी तो यवतमाळ सोडून नागपुरात आला. लग्नास विरोध बघता दोघांनी एक रूम घेऊन ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. रियाच्या कुटुंबियांनी लग्नापूर्वीच शारिकसोबत पत्नीप्रमाणे राहण्यास परवानगी दिली. त्यानंतर दोघेही वाठोडा परीसरात लिव्ह इनमध्ये राहायला लागले. शारिकने फुड डिलेव्हरी करणाऱ्या कंपनीत नोकरी स्विकारली तर रियानेही कामधंदा सुरू केला.

अचानक गेला पळून

रिया आणि शारीक पती-पत्नीप्रमाणे राहू लागले. त्यांचा संसार सुरळित सुरू असतानाच तो घरातून अचानक बेपत्ता झाला. रियाने त्याला फोन लावला असता तो उचलत नव्हता. शेवटी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क करण्यात आला. त्याने चक्क परत नागपूरला येण्यास नकार दिला. तसेच आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे नातेवाईक असलेल्या मुलीशी लग्न करणार असल्याचेही सांगितले. त्यामुळे चिडलेल्या रियाने वाठोडा पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT