file 
नागपूर

कोरोना झाल्यानंतरही ८०० कामगार जीव मुठीत घेऊन येथे काम

अशोक डाहाके

केळवद (जि.नागपूर) : कोरोनाबाधित कामगार कामावर जात असल्याने या कंपनीत आतापर्यंत दोन तरुण स्थायी कामगारांचा मृत्यू झाला. कोरोनापासून कामगारांना सुरक्षित ठेवता येईल, अशी ठोस उपाययोजना कारखान्यात केलेली नसल्याचा कामगारांचा आरोप आहे. जीटीएन कंपनी बंद करणे गरजेचे नसून कामगारांची प्रकृती ठिक नसल्यास कामावर येऊ नये, असे आदेश कामगारांना दिले असल्याचे जीटीएन कंपनीचे पर्सनल मॅनेजर सुरेंद्र महंत यांनी सांगितले.

८०० कामगारांच्या जिवाची हमी कोण घेणार?
अनेक कामगारांना कोरोना झाल्याने त्यांनी घरीच विलगीकरण केले आहे. अशातच या कारखान्यात शरीरातील तापमान तपासणी करुन कामावर घेतले जाते. यामुळे सर्दी, खोकला, दमा, अंगदुखी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कामगारांना कोरोनाची लागन असूनसुध्दा नाईलाजाने काम करावे लागते.  कंपनीतील सर्वच कामगारांची टेस्ट केलेली नसल्याने या कारखान्यातील ८०० कामगार जिव मुठीत घेवून येथे काम करीत आहेत. याचा फटका सावनेर, केळवद, खुरजगाव, मंगसा भागेमाहरी, नरसाळा, परसोडी यासह परिसरातील विविध गावात येथील कामगार असल्याने हे कामगार सर्वांच्या सर्पंकात येत असल्याने रुग्णांत मोठी वाढ होत आहे.सं

संघटना गप्प असल्याचा कामगारांचा आरोप
कंपनीचे कामगाराविषयी असलेले उदासीन धोरण यामुळे दोन कामगारांना जीव गममावा लागला, तर अनेक कामगारांना जिव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. लॉकडाउननतंर कामावर कोणत्याही कामगारांचे निधन कोरोनामुळे अथवा इतर कारणामुळे झाल्यास याची सर्वच जबाबदारी स्वत: कामगारांचीच असेल, असे हमीपत्र लिहून घेतल्याने दोन तरूण कामगारांचा गेलेला जिव आणि कारखान्यात काम करणाऱ्या ८०० कामगारांच्या जिवाची हमी कोण घेणार, असा गंभीर प्रश्न येथील कामगारांपुढे निर्माण झाला आहे. या कारखान्यातील कामगार सघंटना मात्र याप्रकरणी गप्प असल्याचा आरोप कामगार करीत आहेत.

अधिक वाचाः वडीलांनी आईला शिवीगाळ केल्यावरून संतापलेल्या मुलाने केले भयानक कृत्य

मेडीकल रिपोर्ट आल्यानतंर आर्थिक मदत
कंपनी बंद करणे गरजेचे नसून कामगारांची प्रकृती ठिक नसल्यास कामावर येऊ नये, असे आदेश कामगारांना दिले आहेत. आता सर्वच कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी केली जाणार आहे. दोन मृत कामगारांचा मेडीकल रिपोर्ट आल्यानतंर त्यांना कंपनीच्या वतीने आर्थिक मदत केली जाईल.
सुरेंद्र महंत
पर्सनल मॅनेजर
जीटीएन कंपनी, खुरजगाव

योग्य निर्णय घेतला जाईल !
कारखान्यात वाढता कोरोना टक्का आणि दोन कामगारांचा मृत्यू यावर लक्ष केंद्रीत असून संपूर्ण परिस्थितीची पाहणी केल्यानतंर योग्य निर्णय घेतला जाईल.
दीपक करांडे
तहसीलदार सावनेर

 तातडीने आर्थिक मदत द्यावी
कोरोनामुळे तालुक्यातील दोन तरुण कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक कामगार कोरोनाची लागन असताना या कंपनीकडून योग्य ती उपाययोजना केली गेली नाही. कामगारांच्या जिवाशी कंपनी खेळत आहे. मृत कामगारांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.
सतिश लेकुरवाळे
अध्यक्ष, सावनेर तालुका कॉंग्रेस

संपादनः विजयकुमार राऊत

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha vs OBC reservation: तर लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची मागणी पूर्ण करा, बनराव तायवाडेंची मोठी मागणी! सरकारवर दबाव वाढला

Pune Station Update : पुणे स्थानकावर 'एम यूटीएस' सेवा सुरू; तिकीटासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही

Kolhapur Digital Scam : कोल्हापुरातील नामांकित डॉक्टर पिता-पुत्राला ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे ४२ लाखांचा गंडा

'मी माझ्या भावनांना कंटाळलोय..'; चिठ्ठी लिहून 25 वर्षीय कॉम्प्युटर इंजिनीअरनं घेतला गळफास, आयटी कंपनीत करत होता नोकरी

Gold Rate Today: सोनं 3,300 रुपयांनी महागलं; भाव 1 लाख रुपयांच्या पुढे; चांदीच्या भावात मात्र घसरण, कारण काय?

SCROLL FOR NEXT