file photo
file photo 
नागपूर

व्वा...कोरोनाकाळातही नागपूरचे बुद्धिबळपटू ऑनलाइन स्पर्धांमध्ये व्यस्त

नरेंद्र चोरे

नागपूर : कोरोनामुळे शहरातील सर्वच 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज' बंद झाल्याने खेळाडू घरांमध्ये कोंडले आहेत. दैनंदिन सरावासोबतच खेळावरही बंधने आल्याने खेळाडूंमध्ये कमालीची निराशा पसरली आहे. अशा परिस्थितीत नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने ऑनलाइन स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना मोठा आधार दिला आहे. या स्पर्धांमुळे बुद्धिबळपटूंना लॉकडाउनकाळात व्यासपीठ तर मिळालेच, शिवाय त्यांना रोख पुरस्कार जिंकण्याची संधीही प्रदान केली आहे. 


गेल्या मार्चमध्ये देशभर लॉकडाउन लागल्यानंतर उपराजधानीतील खेळांनाही अचानक 'ब्रेक' लागला. त्यामुळे पाच सहा महिन्यांपासून बहुतांश खेळाडू घराबाहेरच पडले नाहीत. मात्र या अडचणीच्या काळात नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने युवा खेळाडूंना ऑनलाइन स्पर्धांचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. संघटनेतर्फे गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे जिल्हास्तरीय ऑनलाइन रॅपिड व ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन सुरू आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून अनेक युवा खेळाडूंना 'मॅच प्रॅक्टिस'सोबतच व्यासपीठही मिळत आहे. याशिवाय त्यांना रोख पुरस्कारही जिंकण्याची संधी मिळत आहे. संघटनेतर्फे आतापर्यंत विकेंडला बारा ब्लिट्झ आणि चार रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांना बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला असल्याचे संघटनेचे सचिव के. के. बराट यांनी सांगितले. या स्पर्धांमध्ये खेळाडूंना नेहमीच्या स्पर्धांचा अनुभव मिळत नसला तरी त्यांची स्पर्धेत खेळण्याची इच्छा निश्चितच पूर्ण होत आहे. 


बराट म्हणाले, लॉकडाउनमध्ये शहरातील बुद्धिबळपटू खेळात व्यस्त राहावे, हा या स्पर्धांमागचा मुख्य उद्देश आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय पंच स्वप्नील बन्सोडसह उमेश पाणबुडे व प्रवीण पानतावणे खूप मेहनत घेत आहेत. आतापर्यंतच्या स्पर्धांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता आम्ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचाही विचार करीत आहे. चांगला प्रायोजक मिळाल्यास आम्ही नक्कीच राज्य स्पर्धेचे आयोजन करू शकतो. राज्य स्पर्धेत नामवंत खेळाडू सहभागी होणार असल्याने युवा खेळाडूंचाही फायदा होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे कोरोनाकाळात राज्यात सक्रीय असलेली नागपूरची एकमेव संघटना आहे. 


' जिल्हास्तरीय स्पर्धांना खेळाडूंकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून आमचाही उत्साह वाढला आहे. आमच्याकडे स्वप्नीलच्या मार्गदर्शनात काम करणारी उत्तम ऑनलाइन टीम आहे. त्यामुळे त्यांच्या भरवश्यावर आम्ही भविष्यात निश्चितच राज्य स्पर्धेचे आयोजन करू शकतो. स्पर्धेत आकर्षक पुरस्कार राशी राहिल्यास अनेक मोठे खेळाडू आकर्षित होऊ शकतातस असा आम्हाला विश्वास आहे.' 
-के. के. बराट, सचिव, नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटना  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT