exam 
नागपूर

करोनाच्या वादळात नागपूर विद्यापीठाने एक-दोन नव्हे, तब्बल 187 परीक्षा ढककल्या पुढे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग अधिकच वाढत चालला आहे. त्याबद्दल काळजी घेण्यासाठी शहरातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, त्यानंतरही झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने सोमवारी (ता.16) आरोग्य विभागाच्या शिफारसीनुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील सर्वच विद्यापीठातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारपासून (ता.17) 31 तारेखपर्यंतच्या विद्यापीठाच्या 187 परीक्षा आणि त्यांचेशी संबंधीत प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने घेतला आहे.

राज्यात शनिवारी (ता.14) राज्य सरकारने नगरपालिका, महापालिका, खासगी शाळा, विद्यापीठातील विभाग आणि त्यांचेशी संलग्नित महाविद्यालयांना बंद करण्याचे आदेश काढण्यात आले होते. दरम्यान यामध्ये परीक्षा बंद करण्यावर कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्यामुळे पाच मार्चपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू झालेल्या परीक्षा पूर्ववत ठेवण्यात आलेल्या होत्या. दरम्यान कोरोनाचा राज्यात वाढलेला प्रभाव बघता सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा वगळता सर्वच विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षा सुरू असून 19 पासून दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा सुरू होणार होत्या. यामधील 187 परीक्षा रद्द करण्यात आलेल्या असल्याचे परीक्षा व मूल्यमापम मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले. दरम्यान दुसऱ्या सत्रास सर्वच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. मात्र, 1 एप्रिलपासून नियमित परीक्षा होईल, त्यात कुठलाही बदल करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

3 एप्रिलपासून तिसरा टप्पा
विद्यापीठाच्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा तिसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार असून 3 एप्रिलपासून तो टप्पा सुरू होणार आहे. यामध्ये एम.ए.,एम.कॉम, एमएस.स्सी, बीएस.स्सी, बीपीए, बीए, बी.कॉच्या प्रथम, तृतीय आणि पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षा घेण्यात येईल. याशिवाय चौथ्या टप्प्यात अभियांत्रिकीसह, एमबीए, औषधनिर्माणशास्त्र यासारख्या व्यावसायिक परीक्षांचा समावेश करण्यात आलेला आहे. दरम्यान ज्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्या परीक्षा मे महिन्यातच पूर्ण करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

निकाल, प्रवेश प्रक्रियेवर परिणाम
विद्यापीठाच्या तब्बल 187 परीक्षा पंधरा दिवसांनी पुढे जाणार असल्याने परीक्षांचे निकाल आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेवर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 25 जूनपर्यंत विद्यापीठाच्या परीक्षेचे वेळापत्रक ठरले होते. त्यानंतर लगेच प्रवेशाला सुरुवात होते. मात्र, आता परीक्षा समोर ढकलण्यात आल्याने रविवारीही परीक्षा होण्याची शक्‍यता आहे.

वसतिगृहे होणार रिकामी
विद्यापीठाच्या परीक्षा समोर जाणार असल्याने विद्यापीठाची चारही वसतिगृह रिकामी करण्यात येणार आहेत. यात तीन मुलांची तर मुलींच्या एका वसतिगृहाचा समावेश आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांनाही घरी जाण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. यासह वसतिगृहाचे निर्जंतूकीकरण केले जाणार आहे.

अशा आहेत परीक्षा (रिपीटर विद्यार्थी)
एम.ए. - पहिले, तिसरे आणि पाचवे सत्र
एमएस.स्सी - पहिले, तिसरे आणि पाचवे सत्र
एम.कॉम - पहिले, तिसरे
बी. कॉम.- पहिले, तिसरे
बीएस.स्सी - पहिले, तिसरे आणि पाचवे सत्र
बीपीए - पहिले, तिसरे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT