Examination News about Nagpur University 
नागपूर

परीक्षेबाबतच्या अध्यादेशाचा लावला सोयीचा अर्थ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यातील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षातील शेवटच्या सत्राच्या परीक्षा घेण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या अध्यादेशाचा सोयीनुसार अर्थ लावण्याचा प्रकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे करण्यात येत आहे. अध्यादेशात महाविद्यालयात परीक्षा घेण्यासंदर्भात म्हटले असले, तरी त्या परीक्षा विद्यापीठाच्या नियंत्रणाखालीच घेण्याचा उल्लेख असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यावरच अधिक भर देण्यात येत असल्याचे समजते.

राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाद्वारे विद्यापीठांना पाठविण्यात आलेल्या शिफारशीनुसार 13 मार्चपर्यंत शिकविण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसार विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या शेवटल्या सत्राच्या परीक्षा घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी विद्यापीठास्तरावर नियोजन करण्याचे आदेश विभागाकडून देण्यात आलेले आहे. नागपूर विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाच्या शेवटल्या सत्राच्या 1 लाख 5 हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता त्या परीक्षा वाढीव केंद्र आणि विद्यापीठास्तरावर घेणे अशक्‍य असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे.

त्यामुळे आता महाविद्यालयांना परीक्षांचे अधिकार देऊन त्यांनाच प्रश्‍नपत्रिका काढणे आणि मूल्यांकन करून गुण पाठविण्याबाबत विद्यापीठ विचार करीत आहे. मात्र, असे केल्यास परीक्षेचे पावित्र्य आणि पदवीची गुणवत्ता टिकेल काय, हा प्रश्‍न आहे. विशेष म्हणजे, अहवालातील शिफारशीमधील पहिल्याच शिफारशीमध्ये याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. दुसरीकडे अहवालात स्पष्टपणे विद्यापीठाने अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार परीक्षा घेऊन त्या स्वत:च्या नियंत्रणाखालीच घेणे अपेक्षित असल्याचे नमूद केले आहे.

त्यामुळे महाविद्यालयात परीक्षा झाली, तरी त्यासाठी प्रश्‍नपत्रिका देणे आणि उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन विद्यापीठाकडूनच करणे अपेक्षित आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून विद्यापीठाद्वारे सगळे सूत्र महाविद्यालयांच्या हातात देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे पुढे या पदवीच्या गुणवत्तेवर आक्षेप नोंदवून न्यायालयात दाद मागण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळे सरकार आणि विद्यापीठाची नाचक्की होऊ नये.

जबाबदारी विद्यापीठाचीच
अहवालातील शिफारशीनुसार महाविद्यालयात परीक्षा घेतली, तरी त्या परीक्षांवर विद्यापीठाचे नियंत्रण असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याचाच अर्थ प्रश्‍नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांची जबाबदारी विद्यापीठाची राहील. परीक्षेचे पावित्र्य आणि पदवीची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी हे आवश्‍यक आहे.
डॉ. अभय वाघ, संचालक, उच्च व तंत्रशिक्षण आणि समिती सदस्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT