Toilet Sakal
नागपूर

दोन स्वच्छतागृहांच्या नुतनीकरणावर ३५ लाखांचा खर्च!

मेडिकल कॉलेज; अत्याधुनिक रुपडे बदललेले स्वच्छतागृह कुलूप बंद

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - नागपुरातील मेडिकल कॉलेज. दर दिवशी कोणत्यातरी विषयामुळे चर्चेत असते मेडिकल.मंगळवारी (ता.७) एक नवीच चर्चा पुढे आली. दोन वर्षांपूर्वी तयार झालेल्या स्वच्छतागृहांवर तासभराची चर्चा रंगली असून मेडिकल कॉलेज परिसरातील अवघ्या दोन स्वच्छतागृहांच्या नुतनीकरणावर तब्बल ३५ लाख रुपये खर्च केला. नुतनीकरणावर ३५ लाखाचा खर्च केल्यानंतरही या स्वच्छतागृहाचा वापर मात्र अद्याप कोणीच केला नाही. दोन्ही स्वच्छतागृह कुलूपबंद ठेवली आहेत. ही दोन्ही स्वच्छतागृह वापरामुळे अस्वच्छ होतील या भीतीने याचा वापर होत नाही का? असा सवाल मेडिकल कॉलेजमधील कर्मचाऱ्यांनी केला आहे.

दोन वर्षांपूर्वी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा होते. त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये असलेल्या ४ स्वच्छता गृहापैकी १० बाय १० च्या दोन स्वच्छतागृहांना अत्याधुनिक रुप देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोन्ही स्वच्छतागृह तयार केली आहेत. प्रत्येकी १७ ते १८ लाखाचा खर्च एका स्वच्छतागृहावर झाला. असे दोन स्वच्छतागृह तयार करण्यात आले. यासाठी सुमारे ३५ लाखांचा खर्च आला आहे. बांधकाम विभागाने या दोन्ही स्वच्छतागृहांचे हस्तांतरण मेडिकल प्रशासनाला केले आहे. मात्र या स्वच्छतागृहांचा वापर होत नसल्याची जोरदार चर्चा मेडिकल कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे.

चोरी होऊ नये म्हणून…

मेडिकल प्रशासनाने तयार केलेल्या अत्याधुनिक अशा दोन स्वच्छतागृहाचा सर्रास वापर सुरू केला तर या स्वच्छतागृहात असलेल्या नळ व इतर साहित्यांची चोरी होण्याची भीती व्यक्त होत आहे. चोरीच्या भीतीपोटी पुरुषांसाठी तयार करण्यात आलेल्या या स्वच्छतागृहाचा वापर होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तर महिलांसाठी तयार केलेल्या १८ लाखांच्या स्वच्छतागृहाचा वापर होत असून ज्या महिलेस स्वच्छतागृहाचा वापर करावयाचा आहे, ते किल्ली घेतात, वापर करतात, पुन्हा किल्ली संबंधिताकडे देतात, या तत्त्वावर वापर सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र काहींच्या मते सुरूच करण्यात आले नसल्याची माहिती पुढे आली. प्रशासनाला विचारले असता, त्यांनी नुसते स्मित हास्य केले आणि शांत झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT