Zero Shadow  esakal
नागपूर

Zero Shadow : पण एक दिवस सावलीही साथ सोडते.!

Zero Shadow : उपराजधानीत २६ मे रोजी अनुभवा शुन्य सावली दिवस

सकाळ वृत्तसेवा

Zero Shadow : काहीही झाले तरी आपली सावली आपल्याला कधीही सोडून जात नाही, असे म्हटले जाते. पण, २६ मे रोजी दुपारी १२ ते १२.०५ या कालावधीत काही मिनिटांसाठी काही क्षणांसाठी का होईना, सावली तुमची साथ सोडणार आहे.

नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी ही स्थिती अनुभवता येणार आहे. वर्षातून दोनदा पृथ्वीच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थितीमुळे ‘झिरो शॅडो डे’ अनुभवता येतो. नागपूरसह विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, गडचिरोली येथील नागरिकांनाही येत्या काही दिवसांत हा अनुभव घेता येणार आहे.

पृथ्वी ज्या पातळीवरून सूर्याची परिक्रमा करते, त्या पातळीला पृथ्वीचा अक्ष कललेला आहे. वर्षभरात पृथ्वीच्या वेगवेगळ्या अक्षांशांवर सूर्य किरणे क्रमाक्रमाने वेगवेगळ्या दिवशी लंब पडतात आणि ज्या अक्षांशावर सूर्याची किरणे लंब पडतात, त्या अक्षांशावरच्या लोकांना सुमारे मिनिटभर आपली सावली हरवल्याचा अनुभव येतो.

हाच अनुभव उपराजधानीसह राज्यातील अनेक शहरातील नागरिकांना घेता येणार आहे. वर्षातून दोनदा ही भौगोलिक स्थिती आपल्याला अनुभवता येते. काही क्षणांसाठी आपली सावली अगदी पायाशी येते जणू ती नाहीशी होते, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

कधी असतील शून्य सावली दिवस

२४ मे- उमरेड

२६ मे -नागपूर

२७ मे - सावनेर, काटोल, रामटेक

२८ मे - नरखेड

विविध शहरात विविध दिवशी अनुभव

भौगोलिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या हे महत्त्वाचे शून्य सावली दिवस महाराष्ट्रात आजपासून सुरू झालेले आहे. ३१ मे पर्यंत राज्यातील विविध शहरांमध्ये तो अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे भारतात २३.५० अंशाच्या पुढे दिल्ली, हिमाचल प्रदेश, कश्मीर या राज्यात कुठेही शून्य दिवस घडत नाही. आज सावंतवाडी येथे शून्य दिवस अनुभवता आला. दक्षिणायन सुरू झाल्यानंतर पुन्हा भोपाळ ते अंदमान भागात पावसाळ्यात शून्य सावली दिवस येतात असेही प्रा. चोपणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Flood Update : कोल्हापूर जिल्ह्यातील १० तालुक्यांच्या पूरस्थितीचा आढावा, काय सुरू काय बंद; जाणून घ्या एका क्लिकवर

BIG UPDATE ON TEAM INDIA: श्रेयस अय्यरच्या खांद्यावर बंदूक अन् रोहित शर्माची विकेट! BCCI च्या चक्रव्यूहात अडकणार हिटमॅन

JM Road History : ५० वर्षांत एकही खड्डा नाही... जंगली महाराज रस्त्याचा मास्टर इंजिनीअर कोण? काय आहे इतिहास?

Stock Market Opening: शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी 25,100 च्या वर, कोणते शेअर्स वाढले?

Pune News : एकतानगरीत परिस्थिती नियंत्रणात, महापालिकेकडून २४ तास यंत्रणा सज्ज; जवानही तैनात

SCROLL FOR NEXT