Explosion during maintenance work closed 6th section Silewada Coal Mine 10 people burned 2 injured sakal
नागपूर

Nagpur : सिल्लेवाडा कोळसा खाणीत स्फोट; दहा जण भाजले, दोघे गंभीर जखमी

सिल्लेवाडा कोळसा खाणीतील बंद असलेल्या ६ सेक्शनमध्ये मेन्टेनन्सचे काम करीत असताना स्फोट

सकाळ वृत्तसेवा

खापरखेडा/सिल्लेवाडा : सिल्लेवाडा कोळसा खाणीतील बंद असलेल्या ६ सेक्शनमध्ये मेन्टेनन्सचे काम करीत असताना स्फोट झाल्याने दोन कामगार गंभीररित्या भाजले. तर आठ किरकोळ जखमी झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. मात्र, घटनेतील वेगवेगळ्या चर्चेने वातावरण अधिकच तापले होते.

सिल्लेवाडा येथील ६ क्रमांकांच्या सेक्शनमधील कोळसा खाण गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. या खाणीच्या देखभालीसाठी कामगार नियमित जात असत. मंगळवारी सायंकाळी स्कॅनिंगचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. स्फोटात दोन कामगार गंभीररित्या भाजले गेले.

स्कॅनिंगच्या कामावर १० कामगार असल्याची माहिती पुढे आली. यामधील चार कामगार गंभीर जखमी झाले असून त्या चौघांनाही नागपूर येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. यापैकी दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. तर इतर सहा कामगारांवर वलनी वेकोलि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेमके जखमी झालेले कंत्राटी कामगार की वेकोली कर्मचारी यांची माहिती बातमी लिहोस्तर मिळू शकली नाही. अंडरग्राऊंड मॅनेजरच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली अशी चर्चा घटनास्थळी कामगार वर्तुळात सुरू होती.

अशीच घटना मागील काही वर्षापूर्वी घडलेली होती. मंगळवारी घडलेल्या घटनेने येथील वेकोलि कर्मचारी, कंत्राटी कामगारांचा सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या घटनेला जबाबदार कोण?, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे.अपघाताने अधिकारी वर्गात खळबळ उडाली होती.

सात कामगारांच्या मृत्यूची अफवा !

सिल्लेवाडा कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात सात कामगार जळून खाक झाल्याची अफवा सायंकाळपासून सुरू होती. मात्र, रात्री ११ च्या सुमारास दोन कामगार जखमी झाल्याचे पुढे आले. अफवेमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते. दुसरीकडे वेकोलिचे अधिकारी मोबाईल कॉलला प्रतिसाद देत नसल्यामुळे संशयाचे धुके अधिकच गडद होताना दिसून आले.

घटनेतील जखमींची नावे

जखमी जवानांमध्ये सेक्शन इन्चार्ज अनिल बोबडे, कुलदीप उईके (एमटी), अनिल सिंग ट्रेनी, विलास मुढे, राजू शामराव मिसरी, महिपाल, योगेश्वर यांचा समावेश आहे. अमोल बोधले , अनिल सिंह, रामचंद्र गया प्रसाद पाल,मनोज गुप्ता, किशोर घेर आदी किरकोळ जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT