extortion is not new for shivsena said devendra fadanvis  
नागपूर

शिवसेनेसाठी खंडणी नवीन नाही; आघाडीच्या काळात अवैध धंदे वाढले; फडणवीसांची टीका 

राजेश चरपे

नागपूर ः मुंबईत शिवसैनिक खंडणी मागतात हे आरोप काही नवीन नसून महाघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून आवैध गुटखा, मटका आणि मद्य विक्री राज्यभरात जोरात सुरू असल्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस नागपूरध्ये आले असताना त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. मनसेचे नेते यांनी बोगस पावत्या दाखवून मुंबई महापालिकेत शिवसेच्यावतीने खंडणी वसूल केली जात असल्याचा आरोप केला होता. याबाबत विचारणा केली असता फडणवीस यांनी मनसेने काय आरोप केले आपल्या ठाऊक नसले तरी खंडणीखोरी शिवसेनेसाठी नवी नसल्याचा टोला हाणला. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुतणे तसेच माजी आमदार आशिष देशमुख यांनी काटोल-नरखेडमध्ये सर्रासपणे सुरू असलेल्या मटका, जुगाराच्या आरोपावर फडणवीस यांनी हा प्रकार राज्यभर सुरू असल्याचे सांगितले.

कोरानाच्या काळात वीज भरले नसलेल्या राज्यातील ७८ लाख ग्राहकांना वीज कनेक्सन तोडण्याच्या महावितरण विभागाने नोटीस पाठवल्या आहेत. याविरोधात भाजपच्यावतीने सातत्याने आंदोलन केले जात आहे. वीज बिल माफ होत नाही तोवर आमचे आंदोलन सुरू राहील,असेही फडणवीस यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Latest Update : अखेर शिक्कामोर्तब! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; सुप्रीम कोर्टाकडून वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यास परवानगी

Team India: सुट्टी नाहीच! फक्त विराट-रोहितच नाही, तर सर्वच भारतीय खेळाडूंना BCCI ची चपराक; ते सामने खेळा, तरच...

Bullet Train: मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनला RPF कवच मिळणार! 'या' स्थानकांवर स्टेशन उभारणार; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योजना

Tilak Varma T20 Record : तिलक वर्माचा ‘T20’ मध्ये बडा कारनामा!, 'या' बाबतीत विराट अन् शुभमनलाही टाकलं मागं

वने तू कमाल आहेस! वनिता खरातचा नव्या घरात गृहप्रवेश; 'या' ठिकाणी २३ व्या मजल्यावर घेतलंय हक्काचं घर

SCROLL FOR NEXT