extortion of 22 thousand rupees and kept young woman Mental and physical harassment crime nagpur  sakal
नागपूर

Nagpur Crime : २२ हजार रुपये उकळत युवतीला ठेवले डांबून; नोकरीच्या नावावर केला मानसिक, शारीरिक छळ

नोकरीच्या नावाखाली २१ वर्षीय युवतीला बोलावून तिच्याकडून पैस उकळून तिला तीन दिवस इच्छेविरुद्ध डांबून ठेवत छळ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन युवतींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नोकरीच्या नावाखाली २१ वर्षीय युवतीला बोलावून तिच्याकडून पैस उकळून तिला तीन दिवस इच्छेविरुद्ध डांबून ठेवत छळ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन युवतींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुनम तिवारी (वय २६), अश्‍विनी शेंदरे (वय २४), संजना ठाकरे (वय २२) अशी आरोपी युवतींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशात राहणाऱ्या निकीता नावाच्या युवतीचा मित्र असलेल्या आकाशने तिची ओळख अश्‍विनीशी करून दिली होती.

अश्‍विनी हिने निकिताला वाडी येथे मार्केटिंगचा व्यवसाय करीत असल्याचे सांगितले होते. याशिवाय तिलाही नोकरी हवी असल्यास ती देऊन तिच्या राहण्याची आणि भोजनाची सोय करू शकतात असे सांगितले.

त्यानुसार निकिता ३१ जुलैला पहाटे अडीच वाजता नागपुरात आली. अश्‍विनी आणि संजना तिला घेण्यासाठी बस स्थानकावर आले. तेथून त्या दोघीही तिला वाडी येथील अश्‍विनीच्या कार्यालयात घेऊन गेले. तिला एका खोलीमध्ये झोपण्याची व्यवस्था करून देण्यात आली.

ती कार्यालयात गेली असता, ती ‘ट्य्रुलिड जनरेशन मार्केटिंग प्रा.लि.’ नावाने कंपनी असून त्यात केवळ मार्केटिंगचे काम केले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी यावेळी निकिताकडून २० हजार प्रशिक्षणासाठी तर २ हजार ५०० रुपये आगाऊ रक्कम म्हणून घेतली. यावेळी निकिताला दोघांनीही केवळ मार्केटींग करावी लागणार असे ठणकावून सांगितले.

मात्र, त्याला नकार देत ती खोलीकडे निघून गेली. काही वेळात अश्‍विनी, संजना आणि पूनम या तिघीही तिच्या खोलीत आल्यात. त्यांनी शिवीगाळ करीत, तिचा मोबाइल हिसकावून खोलीत बंद करून निघून गेल्या. २ ऑगस्टला परत येऊन त्यांनी मोबाइल देत, कुणाशी बोलायचे आहे, बोल असे म्हणून फोन देत बोलण्यास सांगितले.

यावेळी भावाला फोन केला. मात्र, त्यांनी फोन बंद केला. काही वेळाने त्याला तिघांपासून लपून जागेचे लोकेशन पाठविले. त्याने लोकेशनच्या आधारे शोध घेत कार्यालय गाठले. निकिताची सुटका करून त्याने थेट पोलिस ठाणे गाठले. याबाबत तक्रार देताच, पोलिसांनी तरुणींच्या विरोधात गुन्हा दाखल करीत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अविनाश निकाळजे यांनी तपास सुरू केला आहे.

कंपनीही बोगस

वाडीत ‘ट्य्रुलिड जनरेशन मार्केटिंग प्रा.लि.’ नावाने असलेली कंपनी बोगस असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याकडे कंपनीसाठी आवश्‍यक असलेले दस्तऐवज नसल्याचीही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, प्रशिक्षणाच्या नावावर येथे मध्यप्रदेशातून मुलांना आणून त्यांच्या माध्यमातून मार्केटिंगच्या नावाने साखळी मार्केटिंग करायला लावून त्यातून बीएमडब्ल्यू कार आणि इतर आमिषेही दाखविण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT