This facility provided by the Municipal Corporation for positive patients 
नागपूर

पॉझिटिव्ह रुग्णांसाठी महापालिकेने दिली ही सुविधा, वाचा सविस्तर

राजेश प्रायकर

नागपूर : शहरात अनेक कोरोनाबाधित घरांमध्येच असून त्यांना रुग्णालयात दाखल होण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेने केंद्रीय कॉल सेंटर सुरू केले आहे. त्यामुळे रुग्णांना फोन करून रुग्णालयात दाखल होण्याबाबत मार्गदर्शन घेता येणार आहे. एवढेच नव्हे तर बेडच्या उपलब्धतेबाबत माहितीसाठीही स्वतंत्र फोन क्रमांक नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरूवारी पाचपावली कोविड केअर सेंटर, पाचपावली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पाचपावली सुतीकागृहला आकस्मिक भेट दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा उपस्थित होते. कोविड केअर सेंटर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सूतिकागृहामध्ये चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची गरज आयुक्तांनी यावेळी व्यक्त केली.

पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कामध्ये आलेल्यांना शोधण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘रॅपिड रिस्पॉन्स टिम’ने कार्यपद्धती वेगवान करावी, पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ‘हाय रिस्क’ रुग्णांचे प्राधान्याने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करून त्यांची लवकरात लवकर चाचणी केली जावी, असे निर्देश यावेळी आयुक्त राधाकृष्णन यांनी दिले.

या क्रमांकावर करा फोन
१) ०७१२-२५५२८६६
२) ०७१२-२५३२४७२
३) १८००२३३३७६४
४) ०७१२-२५६७०२१ (बेडच्या उपलब्धतेसाठी)

 
नागरिकांनी कोविड संदर्भातील कोणतीही लक्षणे दिसताच तसेच संपर्कातील एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याचे लक्षात येताच स्वत:च जबाबदारीने मनपाच्या कोविड चाचणी केंद्रातून चाचणी करून घ्यावी. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये लक्षणे असल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी केंद्रीय कॉल सेंटरवर फोन करून मार्गदर्शन घ्यावे.
राधाकृष्णन बी., आयुक्त, महापालिका.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उड्डाण घेतलं अन् थेट जमिनीवर कोसळलं; हेलिकॉप्टरचा अपघात; सहा जणांचा मृत्यू, कुठं घडली घटना?

Rajnath Singh Statement: धाकड' CM आता बनले 'धुरंधर'! २०२७ मध्ये लगावणार विजयाचा 'सिक्सर'; राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी

सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Pune Crime: चाेरट्यांचा तब्बल २८ तोळे सोन्यावर डल्ला; आंबेगाव तालुक्यातील घटना, घरात काेणी नसल्याने साधला डाव!

SCROLL FOR NEXT