file 
नागपूर

ब्रेकिंग ग्रामीण : झेड.पी.सीईओकडून मिळालेल्या "फेक' बातमीने उडाली खळबळ, काय होती बातमी...

अजय धर्मपुरीवार

हिंगणा (जि.नागपूर) : शहानिशा न करता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांना कुणीतरी "स्क्रीन शार्ट' काढून माहिती दिली. हिंगणा तालुक्‍यात खळबळ उडाली व प्रशासन कामाला लागले. सगळया धावपळीनंतर ही माहिती "फेक' असल्याचे सिद्‌ध झाल्यावर शेवटी प्रशासनाने सुटकेचा श्‍वास घेतला.

अधिक वाचा :   कोरोनासे नही क्‍वारंटाईनसे डर लगता है साहाब, काय आहे कारण...

तालुका प्रशासन हादरले
15 जुलै रोजी हिंगणा तालुक्‍यातून कोरोना संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी आयजीएमसीला पाठवण्यात आले होते. 16 जुलै रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी "स्क्रीन शॉर्ट' च्या माहितीच्या आधारे हिंगणा तालुक्‍यात 22कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती दिली. त्यामुळे तालुक्‍यातील यंत्रणा कामाला लागली. तालुका कोविड समितीचे सचिव जे.के.राव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण पडवे, तहसीलदार संतोष खांडरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.रवीकांत घोडेराव, ग्रामसेवक, तलाठी, आशावर्कर व वैद्यकीय चमू तयार करण्यात आल्या. मोंढा, हिंगणा धनगरपुरा, अमरनगर या ठिकाणी रूग्ण आढळले, अशी माहिती दिली.

अधिक वाचा :"हे' गवत आहे भयंकर विषारी, मात्र मोवाडवासींची ठरली डोकेदुखी...

एका जवाबदार अधिका-याची कृती
त्यानंतर काही भाग सील करण्यात आला. त्यानंतर आयजीएमसीमधील नमुने तपासलेच नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतरच तालुक्‍यातील अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. जि.प.मुख्याधिका-यांनी पाठवलेली माहिती "फेक' असल्याची माहिती मिळाली. एका जबाबदार अधिकाऱ्यांनी ही कृती केल्यामुळे तालुका प्रशासन संपूर्णरित्या वेठीस धरल्या गेले, एवढे मात्र निश्‍चित.

संपादन : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT