family dispute father shoot son nagpur crime update Sakal
नागपूर

Nagpur Crime : आले चौकीदार म्हणताच पित्याने मुलावर झाडली गोळी

Nagpur Latest News : नातवाला कानशिलात हाणल्यामुळे संतापून वडिलाने मुलावर गोळी झाडल्याची थरारक घटना अजनी भागातील ओमसाईनगरात सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : नातवाला कानशिलात हाणल्यामुळे संतापून वडिलाने मुलावर गोळी झाडल्याची थरारक घटना अजनी भागातील ओमसाईनगरात सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. नितीन इंगळे (४०) असे जखमी मुलाचे नाव आहे. तर माणिक इंगळे (६८) असे गोळी झाडणाऱ्या वडिलाचे नाव आहे. नातू नितीनवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, सीआरपीएफमधून माणिक इंगळे सेवानिवृत्त झाला आहे. त्याच्याकडे बारा बोअरची बंदूक आहे. त्याचा परवानादेखील आहे. त्याला पत्नी आणि दोन मुले आहेत. नितीन विवाहित असून त्याला चार वर्षांचा एक मुलगा आहे.

आधी नितीन फर्निचरच्या दुकानात काम करायचा. कोरोनापासून काम सुटल्याने तो रिकामाच आहे. माणिकचा दुसरा मुलगा अविवाहित असून, तो डेअरी चालवितो. नितीन कधी कधी दुकानात बसायचा.

नितीनचा मुलगा लहान असला तरी त्याला शिस्त आणि संस्कार लावण्यासाठी त्याच्यावर रागवायचा व मारायचा . हा प्रकार आजोबा माणिकला आवडत नव्हता. आजोबाचे मन दुखायचे. तो नेहमीच मध्यस्थी करायचा. या प्रकारामुळे नितीनही रागावला होता. घटनेच्या दिवशी सोमवारी रात्री नितीनचे वडील भोजन करून शतपावली करायला गेले. घरी येताच नितीनने टोमणा मारला.

आले चौकीदार, या शब्दाने माणिक प्रचंड संतापला. यावरून बापलेकात भांडण झाले. रागाच्या भरात माणिकने घरात ठेवलेली बारा बोअरची बंदूक काढली. लोड केली आणि नितीनवर गोळी झाडली. गोळी त्याच्या पायावर लागली.

नितीन रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. गोळीबाराच्या आवाजाने शेजारी गोळा झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमी नितीनला रुग्णालयात दाखल केले. आरोपी माणिकविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT