Sitaram Yechury sakal media
नागपूर

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे मोदी सरकारने कृषी कायदे रद्द केले - सीताराम येचुरी

कृषी कायदे केंद्र सरकार मागच्या दाराने लागू करण्याच्या प्रयत्नात - सीताराम येचुरी

नीलेश डोये

नागपूर : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्रातील मोदी सरकारने कृषी कायदे रद्द केले. परंतु, चार राज्यात सत्ता आल्यानंतर आपल्या श्रीमंत मित्रांसाठी हे कायदे मागच्या दाराने लागू करण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार असल्याचे सांगत भारताचे अस्तित्व आणि संविधान टिकविण्यासाठी केंद्रातील आरएसएसप्रणीत मोदी सरकार सत्तेतून घालविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) राष्ट्रीय महासचिव सीताराम येचुरी यांनी केले.

देशपांडे सभागृह येथे आयोजित पक्षाच्या २३ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी पॉलीट ब्युरो सदस्य नीलोत्पल बसू, केंद्रीय कमेटी सदस्य अशोक ढवळे, मरियम ढवळे, जावा गावित, नरसय्या आडाम, विजय जावंधिया, अरुण लाटकर आदी उपस्थित होते. येचुरी यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर प्रखर टीका करीत म्हणाले की, भाजपकडून कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळविण्याचा प्रयत्न होत आहे.

यासाठी विरोधी पक्षाच्या सदस्यांना कोणत्याही परिस्थिती आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात येते. जे येत नाही, त्यांना ईडी, आयटी व इतर प्रशासकीय यंत्रणेचा धाक दाखविण्यात येत आहे. सर्व यंत्रणा ताब्यात घेतल्या. निवडणूक आयोगही काहीच करीत नाही. सीएए, कलम ३७० विरोधात याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

तीन वर्षात त्यावर सुनावणी झाली नसून सरकार मर्जीप्रमाणे धोरणे राबवीत आहे. राजकारणाचे व्यापारीकरण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कृषी कायद्याच्या विरोधात मोठा संघर्ष करावा लागला. जनसंघर्षातूनच सरकारला झुकविता येत. सरकारला ते नको असल्याने आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न होत आहे.

भाजप व आरएसएस हे फासीवादी अजेंडा राबवीत आहे. यामुळे भारताचे अस्तीत्वासोबत संविधान धोक्यात आले आहे. हे टिकविण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारला सत्तेतून घालविण्याची गरज आहे. देशात भांडवलशाही व्यवस्था रुजत आहे. १० व्यक्तींच्या हाती ५७ टक्के मालमत्ता आहे. तर ५० टक्के लोकांकडे १३ टक्के मालमत्ता आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत असून गरीब अधिक गरीब होत चालला आहे. हे चित्र समाजवादातून बदलता येत असल्याचे ते म्हणाले.

भारत अमेरिकेचे बाहुले

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे वजन कमी होत आहे. नोटोकडून अफगाणिस्तातून सैन्य मागे घेण्यात आले असता भारत कोणतीही विचारणा करण्यात आली नाही. अमेरिकेच्या धोरणावर भारत चालत असून त्याचे बाहुले बनले आहे. बाजूच्या देशासोबतही संबंध चांगले नसल्याची टीका येचुरी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

SCROLL FOR NEXT