नागपूर

मल्चिंग, ठिबक सिंचनने पालटले शेतीचे ‘रुपडे’; प्रयोग ‘लाखमोलाचा’

रवींद्र कुंभारे

गुमगाव (जि. नागपूर) : पारंपरिक पिकांना दरवेळी चांगला बाजारभाव मिळेलच असे नाही. त्यामुळे बळीराजाकडून शेतीत वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या पिकांमध्ये मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचा प्रयोग करून आर्थिक उन्नती साधण्याचा यशस्वी प्रयत्न ४२ वर्षीय प्रमोद वासुदेव आष्टनकर या युवा शेतकऱ्याने केला आहे. त्यांचा हा शेतीतील आधुनिक ‘टच’ परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील प्रमोद आष्टनकर यांनी दहावीनंतरचे शिक्षण अर्धवट सोडून वयाच्या सोळाव्या वर्षांपासून वडिलोपार्जित शेती व्यवसायात लक्ष घातले. या शेतीत विविध प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ६ वर्षांपासून मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा शेतामध्ये प्रयोग करून टरबूज, काकडी, वांगी, टमाटर, चवळा, तूर यासारख्या पिकांचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.

वातावरणाचा योग्य अभ्यास करून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खते देत जमिनीचा पोत सुधारला आहे. सोबतच शेतामध्ये आंतरपीक घेऊन उत्पादन क्षमता वाढवून शेतीचे ‘रुपडे’च बदलविले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, मार्केटचा अभ्यास यांची सांगड घालून तयार केलेली पीकपद्धती त्यांना आज लाखमोलाची ठरत आहे.

टरबुजाचे उत्पन्न घेणारे आणि पिकपद्धतीमध्ये मल्चिंगचा वापर करणारे प्रमोद आष्टनकर गुमगाव परिसरातील पहिले शेतकरी आहेत. त्यांच्या शेतातील टरबूजाला आता शहरातील मॉलमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी येण्यास सुरुवात झालेली आहे. मल्चिंग पेपरचा पिकामध्ये प्रयोग केल्यास खर्च कमी आणि उत्पादनात हमखास दीड पटीने वाढ होत असल्याचे आष्टनकर सांगतात.

शेतीची आवड, दररोज मेहनत आणि पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवनवीन पिके घेतली तर शेती फायदेशीर ठरू शकते, हे प्रमोद यांनी दाखवून दिले आहे. आज परिसरातील अनेक शेतकरी प्रमोद यांची शेती पाहण्यासाठी शेतात भेट देत आहेत. त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेतला तर तोट्याचा व्यवसाय समजली जाणारी शेती फायदेशीर ठरू शकेल, यात शंका नाही.

शेती आजही उत्तम असून शेतकऱ्यांनी स्वतः लक्ष दिल्यास व परंपरागत पिकांपेक्षा शेती, पाणी, जमिनीची प्रत, वातावरण पाहून वेगवेगळ्या पिकांची निवड केल्यास भरपूर उत्पन्न मिळते. आपल्याकडील शेतकरी कष्ट करणारे आहेत व येथील वातावरणही शेतीसाठी अनुकूल आहे. समस्यांकडे पाहून रडत बसण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाने त्यावर मात करीत यश संपादन करता येऊ शकते.
- प्रमोद वासुदेव आष्टनकर, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT