Attack sakal
नागपूर

Nagpur Crime : नशेत झालेल्या वादातून बापलेकांनी केला मित्राचा खून; वकिलासह मुलाला कोठडी

दारूच्या नशेत झालेल्या वादातून वकील बापासह त्याच्या मुलाने ६० वर्षीय मित्रावर कुऱ्हाडीने वार करीत खून केला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंदोरा परिसरात दारूच्या नशेत झालेल्या वादातून वकील बापासह त्याच्या मुलाने ६० वर्षीय मित्रावर कुऱ्हाडीने वार करीत खून केला. ही थरारक घटना रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हरीश दिवाकर कराडे (वय ६० रा.हुडको कॉलनी),असे मृताचे नाव असून अॅड. अश्विन मधुकर वासनिक (वय ५६) व त्याचा मुलगा अविष्कार (वय २३ दोन्ही रा.इंदोरा),अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश हे वायुसेनेत कामगार म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांना कामावरून निलंबित केल्याने त्यांनी त्या प्रकरणात वकील म्हणून ॲड. अश्‍विन वासनिक यांनी त्यांची बाजू मांडली होती. त्यानंतर त्यांना मोबदलाही मिळवून दिला होता. त्यानंतर दोघेही चांगले मित्र झाले होते.

रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास हरीश यांनी वासनिक यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. आविष्कार याने मोबाइल उचलला. वडिलांना न भेटण्याचा सल्ला देत त्याने हरीश यांना शिवीगाळ केली. हरीश यांनीही त्याच्यासोबत वाद घातला. त्यानंतर हरीश हे अश्विनच्या घरी गेले. अश्विन व हरीश यांनी पहिल्या माळ्यावरील खोलीत दारू प्यायली. त्यानंतर मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास आविष्कार हा त्यांच्या खोलीत गेला असता, तिथे हरीश दिसल्याने त्याने हरीश यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे दोघांमध्ये वाद होऊन हाणामारी सुरू झाली. दरम्यान मुलाला मारत असल्याचे बघू अश्विन यांनीही हरीश यांना मारहाणीस सुरुवात केली. त्यानंतर आविष्कारने कुऱ्हाड व तर अश्‍विनने चाकूने हरीश यांच्यावर वार केले. हरीश हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. हे बघताच, अश्‍विन यांनी त्यांच्या नातेवाईकांना बोलाविले. नातेवाइकांनी रुग्णवाहिका बोलवून हरीश यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. पोलिसांनी सोमवारी दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची २९ मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. दरम्यान हत्येचा हेतू अद्यापही समोर आला नसल्याने पोलिस तपास करीत आहेत.

आविष्कार व्यसनी स्वभावाचा

आविष्कारचे वडील वकील असले तरी, त्याने मधातूनच शिक्षण सोडले. त्यामुळे तो दारूच्या आहारी गेला होता. शिवाय तो नशाही करीत असल्याची माहिती आहे. याशिवाय त्याचे हरीशसी नेहमीच भांडण व्हायचे.

सहा महिन्यांपूर्वी झाले हरीश यांचे लग्न

हरीश यांचे सहा महिन्यांपूर्वी सोनाली यांच्यासोबत लग्न झाले. सोनाली यांच्या पहिल्या पतीचे अपघातात निधन झाले होते. मात्र, दारूच्या वादातून ही हत्या झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT