The father in law pushed daughter in law from the fourth floor Nagpur crime news 
नागपूर

हुंडाबळी! सासऱ्याने सुनेला चौथ्या माळ्यवरून ढकलले; शारीरिक व मानसिक त्रासानंतर हत्येचा प्रयत्न

अनिल कांबळे

नागपूर : चहा घेण्याची विनवणी करीत मागाहून आलेल्या सासऱ्याने सुनेला चौथ्या माळ्यावरून ढकलून दिले. यात ती गंभीर जखमी झाली असून, खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुनेच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी पती, सासरे, सासू, नणंद व नंदोईविरुद्ध खुनाचा प्रयत्न, हुंड्यासाठी छळण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करिष्मा तामगाडगे (२६) असे जखमी विवाहितेचे नाव आहे. पती साकेत तामगाडगे, सासरे भीमराव, सासू ललिता, नणंद प्राची वासनिक व नंदोई राहुल वासनिक यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तामगाडगे कुटुंबीय न्यू नरसाळा रोड येथील शारदा कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावर वास्तव्यास आहे. प्राची व राहुल मानेवाड्यात राहतात.

पती साकेत हा अभियंता असून करिष्मा गृहिणी आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. लग्नातील आंदण न दिल्याच्या कारणावरून साकेत नेहमीच शारीरिक व मानसिक छळ करीत भांडण करीत असल्याची करिष्माची तक्रार आहे. बुधवारी (ता. २३) दुपारी प्राची पतीसह माहेरी गेली. त्यांच्या उपस्थितीतच पुन्हा नेहमीचा वाद सुरू झाला.

रागाच्या भरात करिष्मा बाल्कनीत जाऊन उभी राहिली. तिच्या तक्रारीनुसार घरातील अन्य सदस्यांनी चहा ठेवला. चहा देण्याच्या बहाण्याने सासरे मागून आले व बेसावध असताना त्यांनी धक्का दिला. चौथ्या माळ्यावरून पडल्याने करिष्मा गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांच्या हाती मोठी ताकद! आता कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलता येणार, फडणवीसांना नवे अधिकार

समर देणार स्पेशल Surprise, 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतील स्वानंदीचा मॉडर्न लूक पाहून चाहते म्हणाले, 'ही तर...'

E10 Fuel: E10 पर्याय पुन्हा आणावा, जुन्या वाहनांसाठी उपयुक्त; मुख्य आर्थिक सल्लागारांची केंद्र सरकारला सूचना

Marathi News Updates : सुप्रीम कोर्टात शिवसेना कोणाची होणार फैसला? धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना मिळणार?

Madhya Pradesh Road Accident : गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात पिकअप-डंपरची धडक, ८ मजुरांचा जागीच मृत्यू, ३२ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT