FDCM officers employees will get 7th Pay Commission arrears nagpur Sakal
नागपूर

Nagpur : खूशखबर! एफडीसीएममधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणार सातव्या वेतन आयोगाची थकबाकी

महाराष्ट्र वनविकास महामंडळातील (एफडीसीएम) अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाराष्ट्र वनविकास महामंडळातील (एफडीसीएम) अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. नुकतीच मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्यात शासनावर कुठलाही आर्थिक भार पडत नसल्याने व महामंडळ आपल्या आर्थिक स्रोतातून वेतन आयोगाचा फरक देण्यासाठी तयार आहे. त्यामुळेच या प्रस्तावाला एकमताने मान्यता देण्यात आली आहे.

अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी ४४ कोटी ६२ लाख इतकी रक्कम मंजूर केली असून ती तीन टप्प्यात देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहेत. महाराष्ट्र वनविकास महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग १ जुलै २०२१ पासून शासनाने लागू केला होता. तर शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू केला.

इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वन विकास महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग हा १ जानेवारी २०१६ पासून लागू करून त्याची थकबाकी मिळावी याकरिता महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ संघटनेने वेळोवेळी प्रशासन व शासनाला पाठपुरावा केला होता. त्यानुसार प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्यासंदर्भात सहमती दर्शन शासनाला प्रस्ताव सादर केला.

तीन वर्षांपासून प्रलंबित प्रस्तावाची दखल

२०१६ पासून सातव्या वेतन आयोगाच्या फरकातील रक्कम देण्यासंदर्भातील प्रस्ताव मागील तीन वर्षांपासून प्रलंबित होता. याकरिता महाराष्ट्रभर वन विकास महामंडळातील अधिकारी व कर्मचारी यांनी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय पाटील यांच्या नेतृत्वात अन्नत्याग सत्याग्रह व काम बंद आंदोलन केले होते. शासनाने अखेर त्याची नोंद घेऊन आता सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ‘आरजेडीने’ विकासकामे बंद पाडली; पंतप्रधान मोदी, इंडिया आघाडी अनैसर्गिक

Latest Marathi News Live Update : इस्लामपूरचं नाव बदललं! आजपासून ईश्वरपूर

Kartik Purnima 2025: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा 'या' वस्तूचे दान आणि ग्रहदोषातून मुक्ती मिळवा!

भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी बॉलिवूड अभिनेत्रीने तिची संपूर्ण ब्रँड एंडोर्समेंट रक्कम दान केली होती, तुम्हाला माहित्येय का कोण आहे ती?

Shivendraraje Bhosale: आगामी निवडणूकीत कसे लढायचे, याचा निर्णय योग्‍यवेळी: मंत्री शिवेंद्रराजे भाेसले; साताऱ्यातील मेळाव्यात नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT