Fight between auto drivers 
नागपूर

एकाशी झाली बोलनी अन्‌ दुसरा म्हणाला बस माझ्या ऑटोत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : प्रवाशांच्या सुविधेसाठी ओला, उबेर सारखे प्रवाशी वाहतूक कॅबसेवा दाखल झाल्या आहेत. ऍपद्वारे ऑनलाईन गाडी बूक करता येते. तसेच नमुद ठिकाणी जाण्यासाठी किती भाडे लागणार याची अगोदरच माहिती मिळत असल्याने प्रवाशांचीही याला मोठी पसंती मिळत आहे. दुसरीकडे याच ऑनलाईन सेवेमुळे ऑटो, रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे प्रवासी आपल्याच गाडीत बसावा यासाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रवाशाला आपल्याच गाडीत बसविण्यासाठी दोन ऑटो चालकांमध्ये सोमवारी चांगलाच राडा झाल्याचे पाहायला मिळाले. 

कॅबसेवेचा थेट परिणाम ऑटो व्यवसायावर झाला आहे. पुरेसा व्यवसाय होत नसल्याने प्रवाशांसाठी ओढाताण करावी लागते. त्यातूनच नागपूर रेल्वेस्थानकावर ऑटोचालकांमध्ये हमरीतुमरी आता नित्याचीच बाब झाली आहे. शुक्रवारी प्रकरण ऑटोच्या तोडफोडीपर्यंत गेले होते. सोमवारी पुन्हा दोन ऑटोचालकांमध्ये तुफान राडा झाला. रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिस या प्रकाराकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते. 

प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपूर रेल्वेस्थानकावर प्रीपेड ऑटो बूथ आहे. रेल्वेस्थानकाबाहेरही ऑटोचालक सवारीच्या शोधात उभे असतात. त्यातच आता खासगी कॅब कंपन्यांची भर पडली आहे. या सर्व प्रकाराने सर्वांच्याच व्यवसायावर परिणाम झाला आहे. सवारीच्या शोधात वाद होण्याची घटना नित्याचीच आहे. सोमवारी सायंकाळी एका ऑटोचालकाने प्रवाशासोबत बोलणी केली. तो ऑटो आणण्यासाठी बाहेर जाताच दुसऱ्या ऑटोचालकाने कमी दरात पोहोचवून देण्याची तयारी दर्शविली. यावरून दोन्ही चालकांमध्ये चांगलाच वाद रंगला. प्रकरण वाढत असतानाच अन्य ऑटोचालकांनी मध्यस्थी करीत वाद सोडविला. 

घटनांकडे सर्रास डोळेझाक

शुक्रवारीसुद्धा अशाच प्रकारे दोन ऑटोचालकांमध्ये वाद झाला होता. त्यातून ऑटोची तोडफोड आणि पळापळ झाली होती. हे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. रेल्वेस्थानकावरील सुरक्षा यंत्रणा मात्र या घटनांकडे सर्रास डोळेझाक करीत आहे. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून आरपीएफला बारीकसारीक सर्वच हालचाली दिसतात. मात्र, ऑटोचालकांमधील वाद का दिसत नाही, असा प्रश्‍न प्रवासी उपस्थित करीत आहेत. अशा वादंगामुळे रेल्वेचीच प्रतिमा डागाळते. यामुळे रेल्वे प्रशासनाने अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून वाद करणाऱ्यांना हुसकावून लावावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: “पंचहात्तरीची शाल अंगावर पडते तेव्हा..”; मोहन भागवत यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ! कुणाला दिला सल्ला?

Latest Maharashtra News Updates : आलमट्टी उंचीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, महाराष्ट्राचे शिष्टमंडळ भेटणार जलमंत्र्यांना

Pune News : रात्रीतून शहर स्वच्छतेला अखेर सुरुवात; पुणे पालिकेकडून १४७२ कर्मचारी, २१३ वाहनांचा वापर

Satara Accident: उलटा धबधबा पाहायला गेलेला युवक मोटारीसह ३०० फूट खाेल दरीत; जखमी युवक वेदनेने ओरडत होता अन् पोलिस...

Kolhapur Municipal : कोल्हापुरात रस्त्यांची दुर्दशा, शहर अभियंतापदाचा खेळखंडोबा; सव्वा महिन्यात हर्षजित घाटगेंची बदली

SCROLL FOR NEXT