नागपूर : आकाश डकाह (वय 20) हा बजाजनगर येथून जात होता. यावेळी बाप लेकांनी आकाशला अडविले. यानंतर त्याच्याशी वाद घातला. "माझ्या मुलीला शिवीगाळ का करतो', असा जाब विचारत लोखंडी पाइपने त्याच्या खांद्यावर मारून जखमी केले. तसेच कोयता काढून आकाशच्या खांद्यावर वार केला. यानंतर लक्ष्मीनगरात चांगलाच राडा झाला. या राड्यात महिला व तरुणींनीसुद्धा सहभागी झाल्या होत्या, हे विशेष...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा गुरुवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास ऍक्टीव्हाने जात होता. यावेळी दिलीप डकाड (45) व मुलगा दिपेन डकाह (28) या बापलेकाने त्याला अडविले. "माझ्या मुलीला शिवीगाळ का करतो', असा जाब विचारत लोखंडी पाइपने त्याच्या खांद्यावर मारून जखमी केले. दिपेनने कोयता काढून आकाशच्या खांद्यावर वार केला. यात तो गंभीर जखमी झाला.
हेही वाचा - सतत प्रियकरासोबत फोनवर बोलत होती पत्नी, पतीने अर्ध्या रात्री केले हे...
आरडाओरड ऐकून आकाशचा चुलत भाऊ मनोज डकाह, मानसी डकाह हेसुद्धा धावले. दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यात दिपेनकडून दिव्या, दीप्ती, टिना या महिलासुद्धा हातात लाठ्या घेऊन विरोधकांवर धावून गेल्या. वाद वाढत असतानाच दिलीपने देशी कट्टा काढून ठार मारण्याची धमकी दिली. प्रकरण वाढत असतानाच दोन्ही गटांनी माघार घेतल्याने अनर्थ टळला. संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह, आर्म्सस ऍक्ट, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 अन्वये गुन्हा नोंदविला आहे. दिलीप डकाड (45), मुलगा दिपेन डकाह (28), दिव्या मलीक (19), दीप्ती डकाह (19) टिना दिलीप डकाह (22) अशी आरोपींची नावे आहेत.
अरोपी व जखमी बजाजनगर हद्दीत लक्ष्मीनगरातील पाण्याच्या टाकीजवळ राहतात. सर्वच एकमेकांच्या नातेसंबंधातच असले तरी आपसात वाद आहे. त्यातूनच दोन गट तयार झाले असून, सतत धुसफूस सुरू असते. गुरुवारी परस्परांना मारहाण करीत देशी कट्टा, सत्तूर व लाठ्या उगारण्यात आल्या. महिला व तरुणींनीसुद्धा या हाणामारीत आघाडीवर होत्या. वेळीच दोन्ही गटांनी पाय मागे घेतल्याने अनर्थ टळला खरा पण, घटनेनंतर रात्रभर या भागात धुसफूस आणि तणावाचे वातावरण होते. याप्रकरणी पोलिसांनी तीन महिलांसह एकूण पाच जणांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.